Rahul Gandhi Truck Video Sakal
Trending News

Rahul Gandhi Truck Video : राहुल गांधी काय गप्प बसेनात; परदेशातही केला ट्रकने प्रवास

राहुल गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ते अमेरिकेमध्येसुद्धा ट्रकने प्रवास केला आहे. त्यांनी अमेरिकेतील तलजिंदर सिंग नावाच्या एका भारतीय ट्रक ड्रायव्हरसोबत प्रवास केला असून यावेळी ड्रायव्हरचे अनुभव जाणून घेत त्याच्यासोबत विविध विषयावर गप्पा मारल्या आहेत.

दरम्यान, एका वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा ट्रकने प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांना विरोधी पक्षातील नेत्यांकडून ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता परदेशातील ट्रकमध्ये प्रवास करताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

"या गाडीची डिझाईन कशी आहे, या ट्रकचे सगळ्यांत चांगले फीचर्स कोणते आहेत, एक वेळी इंधन भरण्यासाठी किती पैसे लागतात, तुम्ही काय खाता, स्पीड लिमीट किती असते. गाडी चालवताना काही त्रास होतो का, कोण कोण त्रास देतं" या गोष्टींवर राहुल गांधी यांनी या ड्रायव्हरसोबत गप्पा मारल्या आहेत. तर येथील गाड्यांचे डिझाईन ड्रायव्हरचा विचार करून बनवल्या असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

हा ड्रायव्हर एका महिन्याला तब्बल आठ लाख रूपये कमावतो असं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर भारताच्या तुलनेत इथे काम पण जास्त कठीण नाही, भारतात ज्या लोकांना काम नाहीये त्यांनी इथे यायला पाहिजे असा संदेशही या ड्रायव्हरने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT