Viral Video Sakal
Trending News

CCTV Footage : प्रवाशांना आपल्या जीवाची एवढीही काळजी का नसते? श्वास रोखून ठेवणाऱ्या घटनेचा Video Viral

"एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून?"

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे रूळ ओलांडताना अनेक धक्कादायक घटना घडल्याचं आपण पाहिलं असेल. अनेकदा ट्रेनखाली आल्यामुळे जीव गेल्याचंही आपण ऐकलं असेल. पण प्लॅटफॉर्म ओलांडताना रूळावरून जाण्याचा कॉन्फिडन्स प्रवाशांमध्ये कुठून येतो? या प्रवाशांना आपल्या जीवाची एवढीसुद्धा काळजी का नसते? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर घटना रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामध्ये एक व्यक्ती एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रूळाचा वापर करत आहे. तर तो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी उडी मारत असताना त्याचा मोबाईल रूळावर पडतो आणि त्याचे स्वत:वरील नियंत्रण सुटते. तो परत फिरतो आणि पुन्हा प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करतो.

त्याला चढेपर्यंत वेगात आलेली ट्रेन जवळ येते. तोपर्यंत तिकडून एक रेल्वे पोलिस कर्मचारी धावत येतो आणि तो त्याला वर येण्यास मदत करतो. अगदी शेवटच्या क्षणी हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर गेला. यावेळी जराही चूक झाली असती तर त्याचा ट्रेनखाली येऊन जीव गेला असता.

वर आल्यानंतर पोलिस कर्मचारी या व्यक्तीच्या कानफडात मारून त्याला चांगला धडा शिकवतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT