Rebirth story Sakal
Trending News

Rebirth : धक्कादायक! "ही आज्जी नाही, माझी बायको आहे", 8 वर्षाच्या मुलाच्या पुनर्जन्माची कहाणी

ही कथा ऐकून आपणही हैराण व्हाल

दत्ता लवांडे

पुनर्जन्माच्या गोष्टी आपण अनेकदा ऐकल्या असतील. बरेच जुने, म्हातारे माणसं अमुक माणसाचा पुनर्जन्म झाला, तमूक माणसाचा पुनर्जन्म झाला अशा कथा सांगत असतात पण या कथांवर विश्वास ठेवणारे खूप कमी असतात. अशीच एक घटना उत्तरप्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यामध्ये घडली आहे. ही कहाणी ऐकून आपल्यालाही धक्का बसेल.

मैनपुरी येथील एलाऊजवळील मंगलपूर या गावात आर्यन दुबे नावाचा अवघा आठ वर्षाचा मुलगा आहे. तो आपल्या आईसोबत ननिहाल रतनपूर येथे आपल्या मामाच्या गावाला आला होता. मामाच्या गावाला त्याचे मामा, मामी यांच्यासहित त्याची आजी राहते. त्याचे आजोबा काही वर्षांपूर्वी वारले होते.

मामाच्या गावाला आल्यानंतर आर्यनच्या आईने सांगितलं की, "आजीच्या पायाला पड." त्यावर आर्यन म्हणाला की, "ती माझी आजी नाही, ती माझी बायको आहे." हे ऐकून सगळेच थक्क झाले. घरच्या लोकांनी त्याच्या या बोलण्याला जास्त महत्त्व दिलं नाही. त्यानंतर आर्यनने सगळी स्टोरी सांगण्यास सुरूवात केली.

त्याने सांगितलं की, "माझं नाव मनोज मिश्रा असं होतं. आठ वर्षापूर्वी म्हणजेच ९ जानेवारी २०१५ साली मी शेतात काम करत असताना मला खड्डा दिसला. शेतात येणारे सगळे पाणी या खड्ड्यामध्ये जात असल्यामुळे मी तो खड्डा पायाने बुजवण्याचा प्रयत्न करत असताना मला सापाने दंश केला आणि त्यामध्ये माझा मृत्यू झाला."

आर्यनने सांगितलेली स्टोरी ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण आर्यनच्या आजीच्या पतीचं नावही मनोज मिश्रा असंच होतं आणि त्यांचासुद्धा आर्यनने सांगितलेल्या दिवशी आणि असाच मृत्यू झाला होता. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला.

त्यानंतर आर्यनने पुढे सांगितलं की, "माझा मृत्यू झाला त्यावेळी माझी मुलगी (सध्याच्या आर्यनची आई) गर्भवती होती. माझ्या तेराव्यानंतर तिला एका गोंडस बाळाने जन्म दिला होता." हे ऐकल्यानंतर आर्यनच्या आईला विश्वास बसला नाही, कारण त्यावेळी जन्मलेल्या आर्यनला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा माहिती झाल्या असतील असा प्रश्न तिला पडला.

या घटनेमुळे आणि आर्यनच्या बोलण्यामुळे ही पुनर्जन्माची गोष्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. आर्यन आपल्या जन्मदात्या आईला आपली मुलगी आणि आजीला आपली बायको असल्याचं सांगतो. एवढंच नाही तर तो ज्यावेळी ४ वर्षाचा होता त्यावेळीसुद्धा तो आपल्या आईला आपली मुलगी असल्याचं सांगत होता असं आर्यनचा मामा अजयने सांगितलं.

आर्यनने मृत मनोज मिश्रा यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ज्या गोष्टी फक्त त्याची सध्याची आजी नीरज मिश्रा यांना माहिती आहेत. त्यामुळे या आजीनेही आपला नातू हा आपला पती असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT