Professor Ranjay Singh esakal
Trending News

VIDEO : प्रवचन देताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका; लोक म्हणाले, असा मृत्यू करोडोंमध्ये एकालाच मिळतो!

लोकांना संबोधित करताना अचानक त्यांचा श्वासोच्छवास थांबला आणि ते मंचावरच कोसळले.

सकाळ डिजिटल टीम

लोकांना संबोधित करताना अचानक त्यांचा श्वासोच्छवास थांबला आणि ते मंचावरच कोसळले.

बिहारमधील छपरा (Chhapra Bihar) इथं मारुती मानस मंदिराच्या (Maruti Manas Temple) सचिवाचा अचानक मृत्यू झाला. मंदिराचे सचिव आणि प्राध्यापक रणजय सिंह (Professor Ranjay Singh) मंचावर प्रवचन देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि ते तिथंच मंचावर कोसळले.

प्राध्यापक रणजय सिंह हे हनुमान जयंती सोहळ्याचे सचिव होते आणि ते शहरातील एक प्रसिद्ध व्यक्ती देखील होते. रणजय सिंह जेव्हा मंचावर प्रवचन देत होते, त्यावेळी ते पूर्णपणे निरोगी होते. पण, लोकांना संबोधित करताना अचानक त्यांचा श्वासोच्छवास थांबला आणि ते मंचावरच कोसळले. हे दृष्य पाहून तिथं उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला.

रणजय सिंह यांना रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी (Doctor) त्यांना मृत घोषित केलं. रणजय सिंह यांची मंचावर अचानक झालेल्या मृत्यूची घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. मंचावर रणजय सिंह यांच्या आकस्मिक मृत्यूचा व्हिडिओ पाहून लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. रणजय सिंह भगवंताचं स्मरण करत त्यांच्या चरणी पोहोचल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. असा मृत्यू फार कमी लोकांना मिळतो. प्राध्यापक रणजय सिंह यांचं वय सुमारे 80 वर्षे होतं. ते एक प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि सामाजिक-धार्मिक विषयाचे गाढे अभ्यासक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT