Russell Brunson Sakal
Trending News

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

रसेल ब्रनसन नावाच्या व्यावसायिकाने 100 वर्ष जूने पुस्तक खरेदी करण्यासाठी खाजगी विमानाने गेला होता.

Puja Bonkile

आजकाल अनेक लोक सोशल मिडियावर जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात. पण अशी काही लोक आहेत ज्यांनासोशल मिडिया नाही तर पुस्तक वाचायला आवडतात. मग ते पुस्तके घेण्यासाठी कुठेही जातात, त्यांना एखादे पुस्तक आवडले तर ते लगेच विकत घेतात. जरी त्याची किंमत जास्त असेल, पण तुम्हाला माहित आहे का की जगात अशी काही पुस्तके आहेत ज्यांची किंमत लाखोंमध्ये आहे? होय सध्या असेच एक पुस्तक आहे आणि ते पुस्तक ज्याने खरेदी केले तो चर्चेत आहे.

खरं तरं हे पुस्तक 100 वर्षे जुने ऐतिहासिक पुस्तक आहे. हे अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी 1925 साली लिहिले होते. या पुस्तकाचे नाव 'द लॉ ऑफ सक्सेस' असे आहे. अमेरिकेतील इडाहो येथील रहिवासी असलेल्या रसेल ब्रन्सन यांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती विकत घेतली आहे. या पुस्तकावर नेपोलियनची सही होती. डेली स्टारच्या वृत्तानुसार, रसेल सांगतात की, जेव्हा त्याने हे पुस्तक ऑनलाइन विकले जात असल्याचे पाहिले तेव्हा तो विरोध करू शकला नाही आणि त्याने ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

महिनाभर बोलणी करावी लागली

या पुस्तकाची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने ते विकत घेणे इतके सोपे नव्हते. रसेल म्हणतो की त्याने विक्रेत्याशी सुमारे एक महिना वाटाघाटी केल्या आणि शेवटी एक करार झाला. परंतु या काळात त्याला आपल्या पत्नीलाही मनवावे लागले, कारण ती इतके महाग पुस्तक विकत घेण्यास तयार नव्हती. नंतर रसेलने आपल्या पत्नीलाही पटवून दिले आणि शेवटी ते पुस्तक विकत घेतले.

मिळालेल्या वृत्तानुसार, रसेल व्यावसायिक असून नेपोलियन हिल यांनी लिहिलेली इतर अनेक पुस्तके खरेदी केली आहेत आणि यासाठी 18 कोटी रुपये खर्च केले आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी ही पुस्तके खाजगी विमानाने जाऊन घरी आणली होती. कारण एवढे महागडे पुस्तक खराब होऊ द्यायचे नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT