Sudarsan Pattnaik creates sand art congratulating PM Modi:  Sakal
Trending News

Lok Sabha Election 2024: भारीचं! वाळूशिल्प साकारत PM मोदींचे अभिनंदन... पाहा Video

Sudarsan Pattnaik creates sand art congratulating PM Modi: प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पीएम मोदींचा अद्भूत वाळूशिल्प बनवले आहे

Puja Bonkile

Lok Sabha Election 2024: लोकसभा २०२४ च्या निवडणूकींचा निकाल ४ जूला जाहिर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा वाराणसीमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 294 जागा जिंकल्या, जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तीन वेळा जिंकणारे मोदी हे पहिले पंतप्रधान बनले. त्यांच्यावर नागरिकांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पीएम मोदींचा अद्भूत वाळूशिल्प बनवले आहे. वृत्तसंस्था एएनआयने याचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये पीएम मोदींनी गुलाबी जॅकेट घातलेले दिसत आहे आणि हात जोडून उभे आहेत. पटनायक यांनी गोलाकारात मोदींचा फोटो साकारला आहे. त्याभोवती गुलाबी रंगाची फुले दिसत आहेत. या वाळूशिल्पाभोवती पटनायक यांनी हिरव्या आणि लाल रंगात 'अभिनंदन मोदी जी' असे लिहिले आहे. व्हिडिओमध्ये अंतिम का पुर्ण करताना पटनायक दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना वृत्तसंस्था एएनआयने लिहिले की, " वाळूशिप्लकार सुदर्शन पटनायक यांनी पीएम मोदींचे अभिनंदन करताना सँड आर्ट बनवले आहे."नहा व्हिडिओ आताप ४५.१ K लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंत केले जात आहे. पटनाईक यांचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, "तुमची कला अतिशय अप्रतिम आहे आणि मोदीजींचे खूप खूप अभिनंदन." दुसऱ्या यूजरने लिहिले "सुंदर" तर एकाने "जय हो" अशी कमेंट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT