Video  Sakal
Trending News

Video : मद्यपान करून स्वत:चीच दुचाकी दिली पेटवून; सांगलीतील धक्कादायक घटना

सकाळ डिजिटल टीम

मिरज : सांगलीतील मिरज तालुक्यात एका व्यक्तीने दारूच्या नशेत आपलीच दुचाकी पेटवल्याची घटना घडली आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावातील ही घटना असल्याची माहिती समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, गावातील चौकामध्ये अनेक लोकं उभी असल्याचं दिसत आहे. तर हा व्यक्ती दारूच्या नशेत असल्यामुळे तो आपली गाडी पेटवण्याच्या प्रयत्नात होता. काही लोकांनी या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आपल्या गाडीला लाथ मारून या व्यक्तीने गाडी पेटवली. गाडीने पेट घेतल्यानंतर आगीचा मोठा भडका उडाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, गाडीने पेट घेतल्यानंतर हा व्यक्ती तिथेच खाली पडला होता. पण त्याला सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही, आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT