Viral Video 
Trending News

Viral Video : सांगलीकरांचा नाद खुळा! आकाशात सोडलं 'दुसरं चांद्रयान'; तरूणाईचा जल्लोष

१४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान -३ चे प्रक्षेपण करण्यात आले.

दत्ता लवांडे

सांगली : १४ जुलै रोजी श्रीहरी कोटा येथून चांद्रयान - ३ या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. या चांद्रयानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. तर यशस्वी प्रक्षेपणानंतर देशभर जल्लोष व्यक्त करण्यात आला. तर चांद्रयानाच्या प्रक्षेपणाचा आनंद महाराष्ट्रातील सांगली येथे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठे एकंद तालुक्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फटाके बनवणाऱ्या कारखान्यांचे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. येथे दसऱ्याला शोभेच्या दारूची आतिषबाजी होत असते. तर चांद्रयानाच्या प्रक्षेपणाचा जल्लोष कवठे एकंद करांनी यान आकाशात उडवून केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सचिन पाटील यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर यामध्ये चांद्रयान -३ ची प्रतिकृती तयार करण्यात आली असून त्यामध्ये शोभेची दारू भरली आहे. तर दारू पेटवल्यानंतर हे यान जवळपास २० ते २५ फुटापर्यंत वर जाते आणि त्यातून पुढे शोभेच्या दारूचे फटाके फोडले जातात. तर डीजेच्या तालावर काही तरूण मुले जल्लोष करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT