Small height Bride and Groom Marriage in bihar Sakal
Trending News

Trending News: रब ने बना दी जोडी! ४२ इंचाचा नवरा तर ४७ इंचाची नवरी

पती पत्नीच्या जोड्या स्वर्गात बांधल्या जातात, अशी आपल्याकडे समजूत आहे. पण बिहारच्या सारण जिल्ह्यामध्ये ही म्हण अगदी खरी ठरली आहे.

वैष्णवी कारंजकर

पती पत्नीच्या जोड्या स्वर्गात बांधल्या जातात, अशी आपल्याकडे समजूत आहे. अगदी चित्रपटांमधूनही याबद्दलचे डायलॉग्स म्हटले जातात. पण बिहारच्या सारण जिल्ह्यामध्ये ही म्हण अगदी खरी ठरली आहे. एका ४२ इंचाच्या नवरदेवाची लग्नगाठ ४७ इंचांच्या नवरीबाईशी बांधली गेली आहे.

शनिवारी मढौरा गड देवी मंदिर परिसरामध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हिंदू पद्धतीने या दोघांचं लग्न झालं.

या लग्नाच्या वेळी वधू पक्षातल्या काही लोकांनी आजतकशी बोलताना सांगितलं की, नवरदेव रोहित आणि नवरी नेहा या दोघांची उंची कमी असल्याने त्यांच्या लग्नाविषयी दोन्ही घरांना चिंता लागून राहिली होती. पण अखेर दोघांची गाठ बांधली गेलीत. कमी उंची असलेल्या रोहितला त्याला अनुरुप अशी नवरी नेहाच्या रुपात मिळाली, त्यामुळे आता दोघेही खूश आहेत.

या दोघांचे नातेवाईकही आता चिंतामुक्त झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मढौरामधल्या लेरुआ गावाचे रहिवासी असलेल्या रोहितचं लग्न खबसी गावातल्या नेहाशी झालं आहे. दोघांचीही उंची खूपच कमी आहे. रोहितची उंची ४२ इंच तर नेहाची उंची ४७ इंच आहे. लग्नानंतर दोघांच्याही घरचे खूश आहेत. त्यांनी या दोघांना सहजीवनासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

उंची कमी असली तर इच्छाशक्ती मोठी आहे...

रोहितने आपली कमी उंची ही आपली दुर्बलता कधी होऊ दिली नाही. रोहितने शिक्षण घेतलं असून त्याने कंपाऊंडरचं काम शिकून घेतलं आहे. त्याची नोकरी सध्या व्यवस्थित सुरू आहे. रोहितचा मोठा भाऊ अमर कुमारने सांगितलं की, उंची कमी असल्याने रोहितला खूप चिडवलं जायचं. पण तरीही रोहितने मढौराच्या जवाहरलाल नेहरु कॉलेजमध्ये इंटरपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि कंपाऊंडरच्या कामासाठीची कौशल्येही शिकून घेतली.

नेहाचं शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच..

तर नेहाचा भाऊ शैलेशने सांगितलं की नेहा पाचवीपर्यंत शिकली आहे. उंची कमी असल्याने नेहाच्या लग्नासाठी चांगलं स्थळ मिळत नव्हतं. कमी उंचीमुळे तिला सतत नकार येत होते. मग कोणीतरी त्यांना रोहितबद्दल सांगितलं. दोन्ही परिवार एकमेकांना भेटले, ओळखपाळख झाली आणि लग्न ठरलं. शनिवारी मढौराच्या गढदेवी मंदिरात आप्तजनांच्या उपस्थितीत दोघांचंही लग्न लागलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT