Viral News Sakal
Trending News

"ती तुझ्याकडेच बघते, प्रपोज कर" मित्रांचं ऐकणं पडलं महागात; प्रपोज करायला गेला अन्... | Viral

'एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे' ही म्हण चांगलीच प्रचलीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Friendship Day Viral Video : 'एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे' ही म्हण चांगलीच प्रचलीत आहे. काहीही नसताना एखाद्याची खूप स्तुती करणे किंवा एखाद्याबद्दल अनेक गोष्टी चांगल्या बोलणे असा या म्हणीचा अर्थ काढला जातो. आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडले असतील. शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना अनेक मुले मुलीला काही ना काही बहाण्याने बोलण्याचा प्रयत्न करत असतात.

सध्या असाच एक प्रकार समोर आला असून एक मुलगा मित्राच्या नादी लागला आणि मुलीला प्रपोज करायला गेला खरा पण घडलं भलतंच. प्रपोज करून प्रेम मिळवण्याच्या नादात या मुलाने मुलीचा मार खाल्ला आहे. सदर व्हिडिओ एका शाळेतील असून दोघेही शाळेतील विद्यार्थी असल्याचं त्यांच्या गणवेशावरून दिसून येत आहे. तर मुलगी या मुलाच्या कानाखाली मारत असून त्याला जाब विचारताना दिसत आहे.

दरम्यान, हा मुलगा मुलीची माफी मागत आहे, हात जोडून मला जाऊदे, सोड असं म्हणत आहे. तरीही मुलगी या मुलाच्या हाताला धरून त्याला प्रपोज का केलं? असं म्हणत जाब विचारत असल्याचं त्यांच्या हालचालीवरून दिसत आहे. मित्राच्या नादाला लागून या मुलाने चांगलाच मार खाल्ला आहे. तर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

"ऐकावे मित्राचे करावे मनाचे, मित्र असाच सल्ला देत असतात, मित्राच्या सांगण्यावरून हा मुलगा हरभऱ्याच्या झाडावर चढला" अशा भन्नाट कमेंट या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT