Viral Video Sakal
Trending News

Viral Video : नाद खुळा! या पठ्ठ्याच्या चंद्रा डान्सने केलंय मार्केट जाम; डान्सरही पडल्या फिक्या

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

चंद्रमुखी या चित्रपटातील चंद्रा या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या गाण्यावरील अनेक डान्सचे व्हिडिओ आणि रील्स आपल्याला बघायला मिळाले. त्याचबरोबर दहिहंडी उत्सव आणि नवरात्री उत्सवातील मुलांच्या डान्सचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते पण सध्या एका शाळेतील लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातील असून त्यामध्ये चंद्रा गाण्यावर मुली डान्स करताना दिसत आहेत. तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका लहान मुलाने समोर मुलीचा डान्स सुरू असताना डान्स केला आहे.

त्याचा डान्स पाहून अनेक लहान मुलांनी त्याला चांगलंच प्रोत्साहन दिलं आहे. या पठ्ठ्याने डान्स करून चांगलाच नाद केला, त्याच्या डान्सपुढे पुढे डान्स करणाऱ्या डान्सरही फिक्या पडल्या अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

Latest Marathi News Live Update : भरधाव कारची ४ ते ५ दुचाकींना धडक; तरुणीचा मृत्यू, नाशिकच्या उपनगर भागातील घटना

SCROLL FOR NEXT