Viral Video Sakal
Trending News

"मोठा हत्ती... मूर्ख"; तपासणी करायला शाळेत गेलेल्या अधिकाऱ्याने शिक्षकांना झापलं! Video आला समोर

सकाळ डिजिटल टीम

पाटना : बिहारमधील आयएएस अधिकारी के.के. पाठक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते एका शाळेतील शिक्षकांना "मोठा हत्ती, मूर्ख" असं म्हणताना दिसत आहेत. त्यांच्या शाळेतील कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, के.के. पाठक हे अधिकारी शिस्तीसाठी कडक मानले जातात. त्यांचे अनेक किस्से आहेत. ते शुक्रवारी वैशाली जिल्ह्यातील शाळांची तपासणीसाठी बाहेर पडले होते. ते हाजीपूर आणि राजापाकड येथील सेनदुआरी शाळेची तपासणी करत होते. शाळेतील एका बंद खोलीवर त्यांचे लक्ष गेले आणि त्या खोलीत असलेले सामान बाहेर काढण्यास शिक्षकांना सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक खोलीत गेले आणि इतर शिक्षक बाहेर होते. बाहेर असलेल्या शिक्षकांना त्यांनी चांगलंच झापलं असून "मोठा हत्ती मूर्ख, मुख्याध्यापक काम करतात आणि शिक्षक उभे राहतात" असं म्हटलं आहे. त्यांच्या आदेशानंतर शिक्षक पळतच वर्गात गेले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी कारवाई करताना एकूण ६ सरकारी शाळेतील एका प्राध्यापकाला निलंबीत केलं असून ५ शिक्षकांचे वेतन रोखलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये ते शिक्षकांना खेळण्याचे सामान बाहेर काढून वापरण्याचे आदेश देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी' मधलं 'सुपरनोव्हा' गाणं प्रदर्शित; पण सुपरनोव्हा म्हणजे काय?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT