CCTV Footage Sakal
Trending News

CCTV Footage : पालकांनो, शाळेत जाणाऱ्या मुलांना सांभाळा! रस्ता ओलांडणाऱ्या मुलीचा थरकाप उडवणारा Video Viral

आपापल्या मुलांना रस्ता सुरक्षिततेचे धडे द्यायला हवेत.

सकाळ डिजिटल टीम

शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना सांभाळणे ही पालकांची जबाबदारी असते. अनेकदा रस्त्या ओलांडताना अपघात होऊन दुर्घटना झाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक लहान शाळकरी मुलगी रस्ता ओलांडताना अपघातातून बचावली आहे.

सदर घटना शेजारीच असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक शाळकरी मुलगी रस्ता ओलांडताना यामध्ये दिसत आहे. एक बस गेल्यानंतर तिच्या पाठीमागून ही मुलगी रस्त्याच्या मधोमध जाते आणि पुढे जाणार तोच दुसऱ्या बाजून स्कूल बस येते.

बस आल्याआल्या ही मुलगी थांबते आणि बस पुढे निघून जाते. काही क्षणात ही मुलगी तत्परता दाखवत थांबली नसती तर मोठा अपघात झाला असता. हा व्हिडिओ पाहून तरी प्रत्येक पालकाने आपल्या शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासंदर्भात सूचना दिल्या पाहिजेत.

दरम्यान, हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून आपण थक्क व्हाल. लहान मुलांना रस्त्याच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रशिक्षण द्यायला पाहिजे. जेणेकरून रस्त्या ओलांडताना काय काळजी घ्यायला पाहिजे याचे मुलभूत ज्ञान त्यांना मिळेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT