Teacher Sleep Sakal
Trending News

Viral Video : विद्यार्थी ग्राऊंडवर अन् मास्तर स्वप्नात! दप्तराची उशी करत गाढ झोपी गेला..

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दत्ता लवांडे

भोपाळ : मध्यप्रदेशमधून एक धक्कादायक बाब समोर आली असून विद्यार्थ्यांना खेळायला ग्राऊंडला सोडून शाळेचा मुख्याध्यापक वर्गात झोपी गेला आहे. तर विद्यार्थ्यांच्या दप्तराला उशी बनवून त्याने डोक्याखाली घेतलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना मध्यप्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर भागात असलेल्या बजौरा येथील प्राथमिक शाळेतील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक राजेश कुमार अर्जरिया हे वर्गात झोपलेले दिसत असून त्यांनी एका विद्यार्थ्याची शाळेची बॅग उशी म्हणून वापरली आहे. गावातील एका गावकऱ्याने हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या खेळण्याचा आवाज येत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून या मुख्यध्यापकाच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याने याप्रकरणी तपासणीचे आदेश दिले आहेत.

याआधीही वर्गात दारू पिऊन आलेले शिक्षक, वर्गात झोपलेले शिक्षक असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण विद्यार्थ्यांच्या दप्तरालाच उशी करून झोपलेल्या या लज्जास्पद प्रकारानंतर नेटकऱ्यांनीही या शिक्षकावर संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT