Shame On MI memes Trending after hardik pandya replace rohit sharma as captain of mumbai indians  
Trending News

Rohit Sharma : दुल्हन की बिदाई का वक्त...; MI फॅन्सवर कोसळलं आभाळ! रोहितच्या हकालपट्टीनंतर मीम्सचं वाढलं पीक

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवलं आहे

रोहित कणसे

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवलं आहे. हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणार आहे. रोहितने ११ सिझन्समध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केलं. त्याला आयपील २०१३ मध्ये कर्णधार पद देण्यात आलं होतं. रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. रोहित खेरीज फक्त महेंद्र सिंग धोनी यालाच पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकता आली आहे.

काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्ससोबत ट्रेड केलं. आता आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघाचा हार्दिक पांड्या कर्णधार बनला आहे. दरम्यान रोहितला बाजूला करत हार्दिककडे कर्णधारपद सोपवल्यानंतर सोशल मीडियावर रोहितच्या चाहत्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर #ShameOnMI हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यासंबंधी अनेक मजेशीर मीम्स देखील शेअर केल्या जात आहेत. यादरम्यान भारतीय टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने देखील हार्टब्रेक इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्माचे फॅन्स सोशल जुन्या चित्रपटातील व्हिडीओ क्लीप्स वापरून तयार केलेल्या मीम्स देखील शेअर करत आहेत. यासोबतच रोहितसाठी काही चाहत्यांनी भावनिक पोस्ट देखील केल्या आहेत.

हार्दिक पांड्याच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने मुंबई इंडियन्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हार्दिक पांड्या आयपीएल २०१५ मध्ये पहिल्यांदा खेळला होता. त्यानंतर तो आयपीएल २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत राहिला. पण आयपीएल २०२२ च्या आधी, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला सोडले. मुंबई इंडियन्सनंतर हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स मध्ये सहभागी झाला. गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर गुजरात आयपीएल २०२३ च्या मोसमात उपविजेती ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT