Video Viral Sakal
Trending News

'मी जेवढा चांगला तेवढाच वाईट, पायाखाली तुडवेन'; शिंदे गटाचे आमदार बांगरांची कंडक्टरला शिवीगाळ | Video Viral

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : हिंगोलीतील कळमनुरी येथील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन शिवीगाळ करून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलींना शाळेतून घरी जाण्यासाठी वेळेवर बस का मिळत नाहीत असा सवाल करत त्यांनी धमकी दिली असून याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मुलींना शाळेतून घरी जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नसल्याची तक्रार कुणीतरी बांगर यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी बस स्टँड गाठले आणि आगार व्यवस्थापकासमोर कंडक्टरला शिवीगाळ केली.

त्याचबरोबर, "तुमच्या बापाची बस आहे का? काही चुकीचं घडलं किंवा कामात सुधारणा झाली नाही तर पायाखाली तुडवेन, तुम्हाला माहितीये माझं काम कसं असतं तर, मी जेवढा चांगला आहे तेवढाच खराब आहे, मला काही कमीजास्त वाटलं तर त्याला लोळेस्तोर मारेल अशी धमकीसुद्धा दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनीही आगारात उपस्थित होत्या.

एखाद्या लोकप्रतिनिधींच्या तोंडून अशी शिवराळ भाषा निघणे कितपत योग्य आहे? असा सवाल आता मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. तर या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला असून अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT