Sidhartha Mallya reveals his best wedding gift A Kama Sutra copy 
Trending News

Siddharth Mallya: सिद्धार्थ मल्ल्याला लग्नात कोणी दिलं 'कामसुत्र'? स्वतःच केला खुलासा

भारतातून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या नुकतंच लग्नबंधनात अडकला.

सकाळ डिजिटल टीम

भारतातून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या नुकतंच लग्नबंधनात अडकला. सिद्धार्थ मल्ल्यानं गर्लफ्रेंड जॅस्मिनशी सात फेरे घेत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच सिद्धार्थच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या त्या पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

सिद्धार्थनं २३ जूनला लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आनंदाची बातमी सांगितली. सिद्धार्थने हिंदू आणि ख्रिश्चिन रितीरिवाजाप्रमाणे जॅस्मिनशी लग्नगाठ बांधली. “MR & Mrs Muppet”, असं लिहित सिद्धार्थाने लग्नातील खास क्षण शेअर केले. दरम्यान, सिद्धार्थने त्याला लग्नात मिळालेल खास गिफ्टचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यामध्ये 'कामसुत्र' हे पुस्तक पाहायला मिळत आहे.

विजय मल्ल्याचे कार्यकारी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या पटेल यांनी सिद्धार्थला हे गिफ्ट दिल्याचे पोस्टमधून समजते. कारण सिद्धार्थ ही कामसुत्र या पुस्तकाचा फोटो शेअर कराताना , "@tushitapatel यांनी मला लग्नात सर्वात सुंदर गिफ्ट दिले आहे." अशी कॅप्शन दिली आहे.

Sidhartha Mallya reveals his best wedding gift A Kama Sutra copy

सिद्धार्थ मल्ल्यानं जॅस्मिनला २०२३ साली कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका हॅलोविन पार्टीमध्ये प्रपोज केलं होतं. सिद्धार्थ मल्ल्याप्रमाणेच जॅस्मिन हीदेखील आधी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. सिद्धार्थ मल्ल्यानं विजय मल्ल्या याच्या बिझनेस एम्पायरव्यतिरिक्त अनेक क्षेत्रात केलंय. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनं डियाजिओ येथे गिनीजचे असिस्टंट ब्रँड मॅनेजर म्हणून काम केलं.

यानंतर सिद्धार्थने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल क्रिकेट संघाच्या संचालकाची भूमिका पार पाडली. सिद्धार्थनं २०१२ मध्ये 'नो बाउंड्री' नावाचा इंटरनेट टॉक शो सुरू केला होता. यातून त्यानं कॉर्पोरेट जगतापेक्षा वेगळी ओळख निर्माण केली. सिद्धार्थनं फॅशन इंडस्ट्रीतही काम केलं आहे. त्यानं अनेक प्रसिद्ध डिझायनर्ससाठी रॅम्पवॉकही केलाय. नुकताच त्यानं स्वत:चा यूट्यूब शो 'सिड सेशन्स' सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT