Wedding Sakal
Trending News

Viral Video : भावाच्या लग्नात अचानक आली विदेशातील बहीण; डोळ्यात तरळले अश्रू

हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतातून परदेशात गेलेले अनेक लोकं भारतीय लग्न सोहळे, सणउत्सव, पार्टी मिस करत असतात. तर अनेकदा त्यांना फोन करून या उत्सवाचा आनंद घ्यावा लागतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी आपल्या भावाच्या लग्नासाठी थेट इंग्लंडहून भारतात आली आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ humans of bombay या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी लग्नाच्या हॉलपर्यंत जाताना दिसत आहे. तर लग्न मंडपात गेल्यानंतर तिची आई आणि तिचे वडील तिला जोराची मिठी मारत आहे. तिला पाहिल्यानंतर आई मोठ्याने ओरडत जल्लोष व्यक्त करताना दिसत आहे.

दरम्यान, भावाला मिठी मारल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू वाहताना दिसत आहेत. तर हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अधिक माहितीनुसार ही मुलगी ८ नोव्हेंबरला नोकरीच्या निमित्ताने इंग्लंडला गेली होती पण २६ नोव्हेंबरला तिच्या भावाचे लग्न होते. त्यानंतर तिने कोणतीही पूर्वकल्पना न देता लग्नासाठी हजर राहिली. तर हा व्हिडिओ २ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोकांनी इंस्टाग्रामवर लाईक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

IND vs PAK : B@#@# मुझे आंख दिखाती है! पाकिस्तानच्या फिरकीपटूने 'डोळे वटारले', हरमनप्रीत कौरने बघा काय केले? Video Viral

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

SCROLL FOR NEXT