Amazon live cobra eSakal
Trending News

Viral Video: काय सांगता! अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर गेलेल्या पार्सलमध्ये आढळला जिवंत कोब्रा; पाहा धक्कादायक व्हिडिओ

A living cobra was found in a parcel ordered from Amazon :जेव्हा त्यांना पार्सल मिळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यामध्ये त्यांना विषारी कोब्रा साप आढळून आला आहे.

कार्तिक पुजारी

बेंगळुरु- कर्नाटकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अ‍ॅमेझॉनमधून ऑर्डर केलेल्या एका पार्सलमध्ये बेंगळुरूच्या जोडप्याला एक साप आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रिपोर्टनुसार, जोडपे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्यांनी ऑनलाईन Xbox कंट्रोलर मागवलं होतं. जेव्हा त्यांना पार्सल मिळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यामध्ये त्यांना विषारी कोब्रा साप आढळून आला आहे. सुदैवाने पॅकेजिंग टेपमध्ये कोब्रा अडकला होता. त्यामुळे तो बाहेर निघू शकला नाही आणि त्याने कोणाला चावा घेतला नाही.

जोडप्याने सदर प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. जोडप्याने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करत म्हटलंय की, आम्ही दोन दिवसापूर्वी Xbox कंट्रोलर मागवलं होतं. पण, त्यात आम्हाला जिवंत साप मिळाला आहे. आम्ही सर्जापूर येथे राहतो. सर्व घटना आम्ही कॅमेऱ्यात कैद केली आहे. शिवाय इतर आमचे मित्र देखील यावेळी उपस्थित होते.

जोडप्याने अ‍ॅमेझॉनवर आगपाखड केली आहे. कस्टमर केअरने त्यांना दोन तास वेटिंगवर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अ‍ॅमेऑनने जोडप्यांना पैसे परत केले आहेत, पण त्यांचे समाधान जालेले नाही. त्यांनी अशा जीवघेण्या प्रकरणासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. हा निष्काळजीपणा असून ग्राहकांच्या जिवाशी खेळ आहे. साप टेपमध्ये अडकला होता, त्यामुळे त्याने काही केलं नाही. अन्यथा विपरीत घडलं असतं, असं जोडप्याने म्हटलं.

अ‍ॅमेझॉनचा प्रतिसाद

अ‍ॅमेझॉनने या प्रकरणाची दखल घेतली आहे. 'अ‍ॅमेझॉनने म्हटलंय की, अ‍ॅमेझॉन ऑर्डरमुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही माफी मागतो. आम्ही या सर्व प्रकाराचा तपास करू. तुमचे आवश्यक ते डिटेल्स आमच्यासोबत शेअर करा. यासंदर्भात कारवाई करून आम्ही तुम्हाला संपर्क करू.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT