Just Looking Like A Wow  esakal
Trending News

Just Looking Like A Wow : ‘जस्ट लूकिंग लाईक अ वॉव’ हा ट्रेंड व्हायरल करणारी महिला आहे तरी कोण?

‘जस्ट लूकिंग लाईक अ वॉव’ या व्हिडिओने इंटरनेटवर धूमाकूळ घातला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Just Looking Like A Wow : आजकाल इंटरनेटवर कोणतेही व्हिडिओ, डायलॉग्ज किंवा ट्रेंडी म्युझिक व्हायरलं व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे, अशा व्हिडिओजला, रील्सला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. अशा प्रकारचे व्हिडिओ लोकांना एवढे आवडतात की त्याचा एक ट्रेंड सेट होतो. हा ट्रेंड सेट व्हायला फारसा वेळ ही लागत नाही हे ही तितकचं खरं आहे.

सध्या सोशल मीडियावर एका रीलने मोठा धूमाकूळ घातला आहे. हा रील व्हिडिओ आहे एका हटके डायलॉगचा. “So beautiful, so elegant, just looking like a wow” हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. या व्हिडिओच्या डायलॉगवर रील्स बनवण्यासाठी सोशल मीडियावर जणू स्पर्धाच लागली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील यामध्ये मागे नाहीत.

आज आपण या गाजलेल्या व्हिडिओचा चेहरा असलेल्या महिलेबद्दल आणि एकूणच या व्हिडिओ प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत.

‘जस्ट लूकिंग लाईक अ वॉव’ डायलॉगमागे आहे तरी कोण ?

So beautiful, so elegant, just looking like a wow या व्हिडिओची सुरूवात जॅसमीन कौर नावाच्या पंजाबी महिलेने केली होती. या महिलेचे दिल्लीमध्ये कपड्यांचे एक बुटिक आहे. त्यांचे स्वत:चे एक इन्स्टाग्राम अकाऊंट देखील आहे. या अकाऊंटवरून त्या आपल्या मैत्रिणीसोबत कपड्यांचे प्रमोशन करतात. ज्यामध्ये सलवार सूट, पंजाबी ड्रेस, कुर्तीज, टॉप्स, स्कर्ट्स इत्यादी अनेक कपड्यांचे त्या प्रमोशन करताना दिसतात.

एक दिवस सहजच सलवार सूट विकण्याच्या व्हिडिओमध्ये त्या उत्साहाने कपड्यांचे कौतुक करताना म्हणाल्या की, ‘जस्ट लूकिंग लाईक अ वॉव’ त्यांचा हा डायलॉग लोकांना खूपच फनी वाटला आणि बघताबघता हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरलं झाला.

जॅसमिन यांच्या या फनी डायलॉगवर अनेक सोशल मीडिया स्टार्सने रील्स बनवायला सुरूवात केली. त्यानंतर, बॉलिवूड कलाकारांनी देखील या डायलॉग्जवर रील्स पोस्ट केले. त्यांच्या या रील्सला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जॅसमिन यांच्या इन्स्टाग्राम हॅंडलचे नाव आहे @designmachinesuitslive.

व्हायरल व्हिडिओची लोकप्रियता

जॅसमिन यांचा हा व्हिडिओ व्हायरलं होण्यामागे लोकांना फक्त त्यांचा डायलॉग आवडला असे नाही, तर या मागे अनेक कारणे देखील आहेत. ज्यामध्ये जॅसमिन यांची कपड्यांचे प्रमोशन करण्याची स्टाईल, त्यांचा बोलण्याचा हाय पीच टोन, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव यांचा समावेश आहे.

इतकच नाही तर कपड्यांचे प्रमोशन करताना त्यांचा उत्साह देखील लोकांना प्रचंड आवडला. त्यामुळे, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलं झाला.

या व्हायरल व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण, भूमी पेडणेकर, वामिका गब्बी, अथिया शेट्टी इत्यादी सेलिब्रिटींनी यावर रिल्स बनवले आहेत. गायक संगीतकार यशराज मुखातेने तर यावर चक्क एक गाणं तयार केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसामुळे भलेमोठे झाड १० ते १२ रिक्षांवर कोसळले, तर कुर्ल्यात वीज पुरवठा खंडित, रहिवाशांचे हाल

World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?

New Luggage Rules : विमान प्रवासाप्रमाणे रेल्वेतही लागू होणार 'लगेज नियम', अतिरिक्त साहित्य घेऊन जाणं पडणार महागात...नेमका निर्णय काय?

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पुणे ते मुंबई जाणारी डेक्कन एक्स्प्रेस मुसळधार पावसामुळे रद्द!

Mumbai Rain Alert: घाटकोपर-अंधेरी लिंक रोड बंद; साकीनाका परिसरात पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT