Viral Video Sakal
Trending News

Viral Video : ओ काकू ही ड्रायव्हरची जागा आहे! एसटीत भयानक गर्दी, ड्रायव्हरच्या सीटवर 4 महिला

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी छप्पर उडालेल्या एसटी बसचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर छतामधून पाणी गळणाऱ्या बसचा आणि समोरील काचेवर असलेले वायपर हाताने फिरवून काचेवरील पावसाचे पाणी साफ करणाऱ्या ड्रायव्हरचाही व्हिडिओ समोर आला होता. यानंतर एसटी महामंडळावर अनेकांनी टीका केली होती. तर छप्पर उडाल्याप्रकरणी सदर अभियंत्याला महामंडळाने निलंबित केले होते.

सध्या एसटीचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही बस सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर ते कुर्डूवाडी या मार्गावर धावणारी बस असून बसमध्ये महिलांची गर्दी झाली आहे. बसण्यासाठी जागा नसल्यामुळे महिला ड्रायव्हरच्या बाजूने बसमध्ये चढताना दिसत आहेत. तर फक्त ड्रायव्हरच्या आसनावर चार ते पाच महिला बसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, यातील एक महिला थेट हॉर्नवर बसल्यामुळे गाडीचा हॉर्न बराच वेळ वाजत होता. ही जागा ड्रायव्हरची आहे असं व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती त्यांना सांगत आहे तरीही महिलांनी या जागेवर बसण्यासाठी गर्दी केली आहे. मुख्य दरावाजा जवळ तर अनेक महिलांची बसमध्ये चढण्यासाठी गर्दी झाली आहे.

काही दिवसांपूर्वी महिलांना एसटीतून प्रवास करण्यासाठी सरकारने ५० टक्के सवलत दिली आहे. त्यानंतर प्रवास करणाऱ्या महिलांची सरासरी वाढली आणि एसटी महामंडळाला यामधून चांगला फायदा झाला आहे. त्यातच आता अनेक बसमध्ये बसण्यासाठी जागा नसल्याचं चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT