Record: वैभव सूर्यवंशी भारतीय फलंदाजांमध्ये ठरला टॉपर! इशान, तिलक, संजूवर पडला भारी; आणखी दोन धावा अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर...

Vaibhav Sooryavanshi breaks Ishan Kishan T20 record: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये धडाकेबाज कामगिरी करत असताना आता त्याने भारतीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये किशोरवयात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याचा मान वैभवने पटकावला.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi surpasses Tilak Varma and Sanju Samson: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील १३ व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी वैभव सूर्यवंशीने ३८ चेंडूंमध्ये ९३ धावांमची शानदार खेळी केली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ७ चौकार आणि १० षटकार ठोकून RRला १९.१ षटकांत २२१ धावांचे लक्ष्य गाठून ५ गडी राखून विजय मिळवून दिला. RR साठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते आणि आपल्या उत्कृष्ट फलंदाजीबद्दल सूर्यवंशीला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने या खेळीसह ट्वेंटी-२० मध्ये भारतीय किशोरवयीन खेळाडूने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com