प्रातिनिधीक फोटो सकाळ
Trending News

हृदयद्रावक घटना! जन्मदात्या आईच्या जाण्याचं दु:ख; जळत्या चितेसमोर लेकाने सोडले प्राण

ही हृदयद्रावक घटना वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक आईचं आणि लेकराचं नात अतूट असतं. आई हे प्रत्येक मुलासाठी वेगळं विश्व असतं. आईसाठी आपलं लेकरू प्रिय असतं, तसंच या नात्यातील बंधनसुद्धा अतूट असतं. मायलेकराच्या नात्यातील अतूट बंधनाचं दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या आईचा मृत्यू सहन न झाल्यामुळे लेकरानेही आपला जीव सोडल्याची घटना घडली आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना उत्तरप्रदेशातील ओब्रा येथे घडली असून हिरामणी गुप्ता या महिलेचे बुधवारी दुपारी निधन झाले होते. त्यांचा मोठा मुलगा राजेश गुप्ता मुंबईत कामाला होता. आईच्या निधनाची बातमी ऐकून मोठा मुलगा राजेश आणि छोटा मुलगा सुरेश हे दोघेही ओब्रा येथे आले.

अंत्यसंस्कारासाठी हिरामणी यांना नदीकाठी नेण्यात आले. त्यावेळी मोठा मुलगा राजेश गुप्ता याने आईला मुखाग्नी दिला. पण अंत्यसंस्कारानंतर थोड्याच वेळात राजेश याचाही धक्क्याने मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

जन्मदात्या आईच्या जळत्या चितेसमोरच लेकाने प्राण सोडल्याची धक्कादायक घटना पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर हा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT