Crime News Sakal
Trending News

Crime News : धक्कादायक! लग्नासाठी मुलगी शोधली नाही म्हणून मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

घटनेनंतर सदर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

तेलंगणा : लग्नासाठी मुलगी शोधली नाही म्हणून एका तरूणाने आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलंगणा राज्यातील सिद्दीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम येथे ही घटना घडली आहे. घटनेनंतर सदर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं.

अधिक माहितीनुसार, बांदा मेलाराम येथे व्यंकटम्मा नावाची ४५ वर्षीय महिला आणि तिचा अवघा २१ वर्षाचा मुलगा ईश्वर राहत होते. मागच्या काही दिवसांपासून ईश्वरसाठी त्याची आई लग्नासाठी मुलगी शोधत होती. पण लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने ईश्वरने आधी विटांनी मारून आईची हत्या केली आणि त्यानंतर पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने आईचा गळा आणि पाय कापले.

पोलिसांनी सांगितले की, दिव्यांग असलेला ईश्वर आपल्याला लग्नासाठी मुलगी शोधावी यासाठी आईवर दबाव टाकत होता. तो दिव्यांग आणि बेरोजगार असल्यामुळे त्याला मुली मिळण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे त्याने आपल्या एका मित्राला हाताशी धरून जन्मदात्या आईची हत्या केली.

यानंतर महिलेच्या मुलीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आणि मुलासह त्याच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्याची कबूली करून घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT