Teeth in Food Sakal
Trending News

Tooth in Food : ब्रिटीश एअरवेजच्या पदार्थांमध्ये सापडला चक्क दात; महिला प्रवासी संतापली

सकाळ डिजिटल टीम

प्रवास करताना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये केस, झुरळ किंवा अळ्या सापडण्याचे प्रकार आपण अनेकदा अनुभवले असतील किंवा ऐकले असतील पण चक्क ब्रिटीश एअरवेजच्या अन्नामध्ये मानवी दात सापडल्याचा दावा एका महिलेने केला आहे. तर हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

(Tooth in food viral photo)

"25 ऑक्टोबर रोजी लंडन ते दुबई या फ्लाइट BA107 मधील आमच्या अन्नामध्ये आम्हाला दात सापडला. हे भयावह असून यासंदर्भात आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. आमचे सर्व दात आमच्याकडे आहेत त्यामुळे हे दात आमचे नाहीत आणि आम्ही तुमच्या कॉल सेंटरवरून कोणाशीही संपर्क साधू शकत नाही." अशी माहिती संबंधित महिलेने देऊन ब्रिटीश एअरवेजला धारेवर धरलं आहे. @ghadaelhoss या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर महिलेने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अन्नाचे पार्सल दिसत असून यामध्ये एक दात असल्याचंही दिसतंय. त्यामुळे ही महिला प्रवासी संतापली असून तिने यासंदर्भात उत्तर मागवले आहे. हा फोटो सध्या अनेकांकडून शेअर केला जात असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT