Trending  esakal
Trending News

Trending : ‘माझ्या पोरीने तुमच्या कंपनीची अंतर्वस्त्रे घातली अन् ती गर्भवती झाली’, महिलेने केला अजब दावा, कंपनीने दिलं सडेतोड उत्तर!

कंपनीकडून या महिलेला अनेक प्रकारे समजवण्यात आले. पण, ती महिला काही ऐकायला तयार नव्हती.

सकाळ डिजिटल टीम

Trending :

लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करतात. परवा आपल्याच राज्यातील एक कपल उंच ठिकाणावर लटकून रिल बनवत होतं. तर दुसरीकडे अनेक सोशल मिडिया रिलस्टार्स व्हिडिओच्या नादात मृत्यूमुखी पडले, तर काही अपंग झाले. हे केवळ प्रसिद्धीसाठी केलं जात आहे.

पण, आज आम्ही ज्या महिलेबद्दल सांगणार आहोत. तीने एक दावा केला आहे. तिचं असं म्हणणं आहे की, माझ्या मुलीने वापरलेल्या अंतर्वस्त्रांमुळे ती प्रेग्नंट झाली आहे. त्यामुळे, कंपनीविरोधात तिने सोशल मिडिया पोस्ट केली आहे. (Trending )

ही घटना भारतातील नसून ती अजब गजब असणाऱ्या चीनमधील आहे. ‘ओडिटी सेंट्रल’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, ताओबाओ ही चीनमधील सर्वाधिक वापरकर्ते असलेली रिटेल कंपनी आहे.

या महिलेने तिच्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, ताओबाओवरून मी माझ्या मुलीसाठी काही अंतर्वस्त्रे खरेदी केली. माझ्या मुलीने ती काही दिवस वापरली आणि ती गर्भवती राहीली. या महिलेने ग्राहक तक्रार निवारण केंद्रात याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

कंपनीने काय दिले उत्तर

कंपनीकडून या महिलेला अनेक प्रकारे समजवण्यात आले. पण, ती महिला काही ऐकायला तयार नव्हती. ती तिचाच खोटा आरोप पुन्हा-पुन्हा पुढे रेटत होती. कंपनीने महिलेला समजावने बंद केले. आणि सोशल मिडियावर स्पष्टीकरण दिले की, आमची अंतर्वस्त्रे बनवणाऱ्या कंपनीत फक्त महिला कामगार आहेत. आणि कंपनीचा मालक जो एक पुरूष आहे त्यानेही नसबंदी केली आहे.

ही महिला तिच्या मुद्द्यावरून माघार घेत नव्हती. तेव्हा कंपनीला ही काळजीही होती, ही महिला जाहीररित्या काहीतरी बोलेल अन् कंपनीच्या प्रतिष्ठेला त्याचा धक्का बसेल. तेव्हा कंपनीने ही महिला कोण आहे याचा शोध घेतला. ती महिला एक सोशल रिलस्टार आहे.आणि ती केवळ प्रसिद्ध होण्यासाठी असे काहीतरी पसरवत आहे हे सिद्ध झाले.

तेव्हा कंपनीने आणखी एक ठोस पाऊल उचलले. या महिलेच्या अन् कंपनीच्यामध्ये जे काही संभाषण झालं होतं ते कंपनीने स्वत:हून जगजाहीर केलं. कंपनीच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर ही पोस्ट करण्यात आली. ती पोस्ट व्हायरल झाली. लोकांनी त्यावर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला. यावर अनेक लोकांनी महिलेला खोटे ठरवले.

या कंपनीच्या CEO नी महिलेची माहिती घेतली. तसेच, तिचे असे खोटा दावा करणे एका यशस्वी उद्योगासाठी किती घातक ठरू शकतं यावर चिंता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT