114 Years old Medical Sakal
Trending News

Trending News: पहिल्यांदाच उघडण्यात आलं ११४ वर्षे जुनं मेडिकल; आत काय काय सापडलं?

हे मेडिकल १८८० मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि १९०९ पर्यंत सुरू होतं.

वैष्णवी कारंजकर

काही ऐतिहासिक गोष्टी या हल्ली कचऱ्यात किंवा अडगळीतच सापडतात. त्यामुळे त्यांचं सौंदर्य आधीपेक्षा काहीसं कमी होतं. पण आता अशी एक जागा सापडली आहे जी ११४ वर्षे जुनी आहे. ही गोष्ट म्हणजे एक मेडिकल स्टोअर आहे.

हे मेडिकल १८८० मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि १९०९ पर्यंत सुरू होतं. याचे मालक ब्रिटनचे असून त्यांचं नाव विलियम व्हाईट असं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर हे मेडिकल बंद करण्यात आलं. आता या मेडिकलचं लॉक उघडण्यात आलं असून त्यात जुन्या अनोख्या गोष्टी सापडल्या आहेत.

मेट्रो युकेने दिलेल्या माहितीनुसार, या मेडिकल स्टोअरचा शोध ८० वर्षांपूर्वी लागलेला आहे. विलियम व्हाईट यांच्या नातीने १९८७ मध्ये या मेडिकलबद्दल लोकांना सांगितलं होतं. आता हे मेडिकल लोकांना पाहण्यासाठी खुलं कऱण्यात आलं आहे. या मेडिकलमध्ये लिक्विड मेडिसिनच्या बरण्या, वजनकाटा, जुना टाईप रायटर आणि इतर काही सामान सापडलं आहे.

जेव्हा विलियम व्हाईट यांच्या मृत्यूनंतर त्यांचं घर विकायला काढलं, त्यावेळी या अज्ञात खोलीबद्दल माहिती मिळाली. याच्याआधी अनेक दशके हे स्टोअर लोकांच्या नजरेस पडलेलं नव्हतं. व्हाईट यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा चार्ल्सने हे दुकान बंद केलं होतं. ही जागा आता पाहिल्यास असं वाटत आहे की जणू या दुकानासोबत काळही थांबलेला आहे.

एका संस्थेला जेव्हा या मेडिकलबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्या संस्थेने हे सांभाळण्याची जबाबदारी घेतली. इथल्या सामानाची यादी करण्यात आली आणि त्या सगळ्या सामानाला आहे तसंच ठेवण्यात आलं आहे. या संस्थेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दुकानात सापडलेल्या सामानावरुन असं दिसून येतं की विलियम व्हाईट एक केमिस्ट होते. पण ते किराण्याचं सामानही ठेवत होते. म्हणजे चहा, तंबाखू, वाईन इ. पण या सामानाला आता धोकादायक मानलं जात आहे. कारण त्या काळामध्ये बाटलीमध्ये बंद करून ठेवण्यात आलेली रसायनं आता घातक ठरू शकतात. दुकानात काही झाडपालाही सापडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT