America Uber Fraud Sakal
Trending News

Trending News: सुट्टी एन्जॉय करायला गेलेल्या जोडप्याला कॅब पडली महागात; बिल आलं २४ लाख

अमेरिकेतील एका जोडप्याला कॅब राईडसाठी इतके पैसे मोजावे लागले की ते कार विकत घेऊ शकले असते!

वैष्णवी कारंजकर

एक अमेरिकन जोडपे ग्वाटेमाला इथं सुट्टीसाठी फिरायला गेले होते. डग्लस ऑर्डोनेझ त्यांची पत्नी डॉमिनिकसोबत त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. या जोडप्याने कॅबची राइड बुक केली होती.

या राइडचे भाडे ५५ डॉलर्स होते. राइड केल्यानंतर, डग्लसने काहीतरी खरेदी करण्यासाठी त्याचं डेबिट कार्ड दिलं आणि त्याला सांगण्यात आलं की त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नाहीत. कॅब कंपनीने त्याच्याकडून २९९९४ डॉलर्स आकारले हे जाणून त्याला धक्का बसला.

जगातील कोणत्याही देशात कॅब राइडची किंमत किती असेल? तुम्ही एकाच शहरात फिरत असाल तर कमाल ३००-४०० रुपये. एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तर पैसे जास्त लागतात. विशेष म्हणजे, अमेरिकेतील एका जोडप्याला कॅब राईडसाठी इतके पैसे मोजावे लागले की ते कार विकत घेऊ शकले असते! (Trending News)

डग्लसने ट्विटरवर लिहिलं की कॅब कंपनीने कोस्टा रिकामध्ये कॅब राइडसाठी त्याच्याकडून २९९९४ डॉलर्स (सुमारे 24.77 लाख रुपये) शुल्क आकारलं. डग्लसने पुढे सांगितलं की कॅब कंपनीने कोस्टा रिकन चलनात त्याचं रुपांतर केलं नाही. २४ तास उलटूनही त्यांची समस्या सुटली नसल्याचं जोडप्यानं सांगितलं. या सगळ्या दरम्यान डॉमिनिकने टिकटॉकवर व्हिडिओही शेअर केला आहे.

 खरंतर कॅबला २९,९९५ कोस्टा रिकन चलनातले पैसे आकारायचे होते. कॅब कंपनीने चार दिवसांनी दाम्पत्याला पैसे परत केले. कॅब कंपनीने बिलात कपात केली, पण कस्टमर केअरचाही फारसा फायदा झाला नाही असं या जोडप्याचं म्हणणं आहे. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर या प्रकरणी दाद मागितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT