Spider in Womans ear Sakal
Trending News

Trending News : महिलेच्या कानात कोळ्याने थाटला संसार; घटना ऐकून अंगावर काटाच येईल!

डॉक्टरही हा प्रकार पाहून गोंधळले होते.

वैष्णवी कारंजकर

चीनमधल्या एका महिलेला विचित्र आवाज ऐकू येत होता. तसंच तिचा कानही दुखत होता. त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली. तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. हे पाहून डॉक्टरही थक्क झाले.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कळलं की, या महिलेच्या कानात एका कोळ्याने आपलं बस्तान बसवलं होतं. डॉक्टरांनी या महिलेच्या कानावर उपचार केले आणि या सगळ्या प्रक्रियेचा व्हिडीओही शूट केला आहे. कानामध्ये या कोळ्याने जाळं विणलं होतं, तेही या व्हिडीओमध्ये पाहता येत आहे.

NDTV ने याबद्दलची माहिती दिली आहे. या महिलेची एन्डोस्कोपी करण्यात आली आणि एका चिमट्याच्या साहाय्याने या महिलेच्या कानातला कोळी आणि त्याचं जाळं काढून टाकण्यात आलं आहे. हुईडाँग कन्ट्री पीपल्स हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी कानात पाहिलं तर त्यांना तिथे एक जाळं दिसलं. डॉक्टरांनी हे जाळं काढून टाकण्याचा प्रयत्न केला. (Latest News)

मात्र, हे जाळं काढताच एन्डोस्कोपीच्या ट्युबवर अचानक कोळ्याने हल्ला केला. तेव्हा कळलं की या जाळ्याच्या मागे कोळी आपलं बस्तान बसवत होता. हा कोळी सुदैवाने विषारी नव्हता. या कोळ्यामुळे महिलेच्या कानाला थोडी इजा झाली आहे. डॉक्टरांनी सर्वांना काळजी घेण्याची आणि कोणतीही शंका आल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT