Trending  esakal
Trending News

Trending : IAS अधिकाऱ्याचं कुत्रं हरवलं, इन्फ्लुएंसरनी पोलिसांपेक्षाही कमी वेळात शोधून दाखवलं!

Dog Missing Case : मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. शहरातील पॉश एरियात घर असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरात २४ जुलैला एक चोरी झाली. चोरांनी या अधिकाऱ्याचे फ्रेंच बुल डॉग विदेशी जातीचे कुत्रे पळवून नेले.

सकाळ डिजिटल टीम

Trending :

पोलिसात असलेल्या एखाद्या व्यक्तीची जर एखादी गोष्ट हरवली. तर संपूर्ण पोलिस स्टेशन कामाला लागतं. मग विचार करा, जेव्हा एखाद्या आयएएस अधिराऱ्याची एखादी गोष्ट हरवते तेव्हा पोलिस ती शोधण्यासाठी काय काय करत असतील.

पण, भारतात अशी एक घटना घडलीय. जिथे एका आयएएस अधिकाऱ्याचे कुत्रे हरवले अन् ते इन्फ्लुएंसरनी शोधले. ही घटना कुठे झालीय, नक्की कशी झाली हे जाणून घेऊयात. 

मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. शहरातील पॉश एरियात घर असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरात २४ जुलैला एक चोरी झाली. चोरांनी या अधिकाऱ्याचे फ्रेंच बुल डॉग विदेशी जातीचे कुत्रे पळवून नेले.

घरातून कुत्रे गायब झाले त्यामुळे अधिकाऱ्याची पत्नी आणि नोकर त्याला शोधण्यात दंग झाले. कुत्र्याला लवकर शोधण्यासाठी त्यांनी एक नवी युक्ती अवलंबली. पोलिसात तक्रार न करता त्यांनी सोशल मिडियावर रिल बनवणाऱ्यांची मदत घेण्याचे ठरवले.पण जेव्हा कुत्रे सापडण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. तेव्हा, सोशल मिडिया रिलस्टार्स कामी आले.

काही सोशल मिडिया स्टार्सना या अधिकाऱ्याने कुत्रे चोरीला गेल्याची माहिती दिली. तसेच, त्यांनी याला शोधण्यासाठी एक मोहिम राबवावी असेही सांगितले.

मध्य प्रदेशमधील अनेक इन्फ्लुएंसरनी या कुत्र्याचा शोध लागावा यासाठी सोशल अकाऊंट्सवर पोस्ट टाकल्या. ‘हरवलेला आहे’  अशा आशयाच्या या पोस्ट मध्य प्रदेशात व्हायरल झाल्या. त्यानंतर रिल्स पाहून लोकांनी या कुत्र्याचा पत्ता मिळवला.

भोपाळमधील कोलारमधील उपनगरात हे कुत्रे सापडले. सोशल मिडिया इन्फ्लुएंसरमुळे हे कुत्रे त्याला मालकाला ४८ तासात परत मिळाले. यासंदर्भात कोणतीही तक्रार पोलिसात करण्यात आली नाही.

मात्र, सोशल मिडियाला वाईट म्हणणाऱ्यांची तोंडे मात्र यामुळे बंद झाली आहेत. कारण, सोशल मिडियामुळेच एक मुका जीव सापडला. त्यामुळे सोशल मिडिया इन्फ्लुएंसरचे कौतुक होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

SCROLL FOR NEXT