Viral Video Sakal
Trending News

Viral Video : केदारनाथमध्ये क्रूर घटना! दोन तरूणांनी घोड्याला जबरदस्ती पाजली सिगारेट

सकाळ डिजिटल टीम

केदारनाथ येथील पायी यात्रा मार्गावर घोडे आणि खेचर मालकांकडून प्राण्यांवर अत्याचार करण्यात येत आहे. घोड्यांना पकडून त्यांना जबरदस्ती सिगारेट पाजली जात असून या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. तर या सिगारेटमध्ये अंमली पदार्थांचा सामावेश केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक माहितीनुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये घोडा-खेचर मालक खेचराचे तोंड दाबून त्याला जबरदस्ती सिगारेट पाजत आहेत. दोन तरूण या घोड्याच्या नाकातून सिगारेटचा धूर देत आहेत. यावेळी सदर प्राण्याला प्रचंड त्रास होत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून आणि पशुपालन विभागाकडून सदर व्यक्तींविरोधात कारवाई केली जात आहे.

दरम्यान, केदारनाथ येथे पावसाळ्याच्या सुरूवातीच्या वेळेस देशभरातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. तर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी काही अंतर पायी प्रवास करावा लागतो. गौरीकुंड येथून केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल १८ किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. त्यासाठी येथे घोडे, खेचर किंवा पाठीवर घेऊन जाणे अशा सेवा स्थानिकांकडून पर्यटकांना देण्यात येतात.

या प्रवासादरम्यान ही घटना घडली असून काही प्रवाशांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. यानंतर रूद्रप्रयाग पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी करण्यात आली असून सदर मालकाविरोधात कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT