Trending  esakal
Trending News

Trending : ‘आधी गरमागरम जिलेबी आणून दे, मग तुझ्या तक्रारीच बघू’ पोलिसांची तरूणाकडे मागणी!

कन्नोज गावातील पोलिसांनी तक्रारदाराकडे बटाटे मागितले होते, पण का?

सकाळ डिजिटल टीम

Trending :

खून, मारामारी, चोरी अशा घटना घडल्यानंतर सर्वात आधी पोलिसांना पाचारण केलं जातं. तर काहीवेळा पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली जाते. सर्वच पोलिस आपल्याला मदत करतात. तर काहीवेळा पोलिस आपल्याला दमवतात.  

तुम्ही दाक्षिणात्य महाराजा चित्रपट पाहिला असेल, महाराजाची तक्रार नोंदवण्यापासून ते त्याची हरवलेली कचरापेटी शोधून देण्यापर्यंत पोलिस त्याला फक्त त्रास देत असतात. असाच काहीसा अनुभव एका व्यक्तीला आला आहे. या व्यक्तीने पोलिसांना तक्रार नोंदवायला लावली तर पोलिसांनी त्याच्याकडे वेगळीच मागणी केली आहे. काय आह नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.

एका व्यक्तीचा फोन हरवला होता. त्याने तडक पोलिस ठाणे गाठले. तो व्यक्ती पोलिसांनी तक्रार लिहून घ्यावी म्हणून विनंती करत होता. पण पोलिसांनी त्याच्याकडे जिलेबीचा हट्ट केला.

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरापासून ९१ किमीवर असलेल्या बहादुरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कनौर या गावातील चंचल कुमार नावाचा व्यक्ती औषधे खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. रस्त्यात त्याचा फोन पडला. शोधूनही फोन सापडला नाही म्हणून चंचल पोलिस ठाण्यात गेला. तिथे पोलिसांनी आम्हाला १ किलो गरमागरम जिलेबी किंवा बालुशाही आणून दिलीस तरच तुझी तक्रार लिहून घेतो, असे सांगितले.

खूप वेळ वाट पाहून चंचल जिलेबी घेऊन आला आणि पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेतली. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेले हे पहिलेच कांड नाही. त्यांनी जनतेला गांभिर्याने न घेता अशाच काही विचित्र मागण्या केल्या आहेत. तसेच,या मागण्यांमुळे पोलिस अधिकाऱ्यांना निलंबनालाही सामोरे जावे लागले आहे.

याच महिन्यात कन्नोज गावातील पोलिसांनी तक्रारदाराकडे बटाटे मागितले होते. बटाटे हा त्या पोलिस ठाणे क्षेत्रातील ‘लाच’ मागण्यासाठीचा कोडवर्ड होता. हे तपासाता उघड झालं. तेव्हा तिथल्या पोलिसाला निलंबित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

SCROLL FOR NEXT