Uttar Pradesh Trending News Sakal
Trending News

Uttar Pradesh: एक जगावेगळी प्रेमकथा; पत्नीचं बनवलं मंदिर, सकाळ - संध्याकाळ करतो पूजा

ज्याप्रमाणे शहाजहानने मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला त्याचप्रमाणे रामसेवक रैदासने फतेहपूर जिल्ह्यात आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ मंदिर बांधले.

वैष्णवी कारंजकर

उत्तर प्रदेशमध्ये, सध्या पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य, सीमा हैदर जी पाकिस्तानातून नोएडाला तिचा प्रियकर सचिनला भेटली आणि नसरुल्लासोबत लग्न करण्यासाठी राजस्थानहून पाकिस्तानात गेलेली अंजू यांची चर्चा सुरू आहे. लग्न आणि धोका देण्याच्या बातम्यांमध्ये सात जन्माच्या प्रेमाच्या आणि नात्याच्या बातम्याही येत आहेत.

फतेहपूर जिल्ह्यात एका पतीने पत्नीच्या स्मरणार्थ मंदिर बांधलं आहे. फतेहपूर, उत्तर प्रदेशमध्ये, एक पुरुष मंदिरात आपल्या पत्नीची मूर्ती स्थापित करतो आणि सकाळ संध्याकाळ तिची पूजा करतो. ज्याप्रमाणे शहाजहानने मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला त्याचप्रमाणे रामसेवक रैदासने फतेहपूर जिल्ह्यात आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ मंदिर बांधलं आहे. बकेवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाधरा गावातून ही बाब समोर आली आहे. (Trending News)

इथं रामसेवक रैदास यांच्या पत्नीचं १८ मे २०२० रोजी कोरोना काळात निधन झालं. पत्नीच्या मृत्यूनंतर तो शांत झाला, एकटा राहू लागला. आपल्या पत्नीच्या स्मृती जपण्यासाठी रामसेवकाने शेतात मंदिर बांधलं. मिळालेल्या माहितीनुसार, राम सेवक रैदास हे अमीन पदावरून निवृत्त झाले आहेत. १८ मे १९७७ रोजी त्यांचा विवाह झाला होता. त्यांनी सांगितलं की पत्नीचा जन्म १८ मे १९६१ रोजी झाला होता. १८ मे २०२० रोजी त्याने पत्नी गमावली.

रामसेवक यांना ३ मुले व २ मुली आहेत. ते म्हणतात की प्रेमाचं लक्षण म्हणून मंदिरात पूजा केल्यानं आपल्याला पत्नीची उपस्थिती जाणवते. म्हणूनच ते रोज आपल्या पत्नीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. सुरुवातीला मंदिर बांधण्याच्या निर्णयाची गावकऱ्यांनी खिल्ली उडवली. मंदिर बांधणाऱ्या राम सेवकने सांगितलं की, जोपर्यंत पत्नी जिवंत होती, तोपर्यंत तिच्यावर अपार प्रेम होतं. माझ्या जीवनात ती त्यागाची मूर्ती बनून आली आणि मला एक काडीही कधी उचलू दिली नाही.

ती म्हणायची की मी करेन, तुम्ही बसा. अशाप्रकारे कोरोनाच्या काळात तिचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो. आम्ही इतके व्याकूळ झालो होतो की आम्ही काय करावे या विचारात होतो. मी तिला रात्रंदिवस आठवू लागलो. अचानक माझ्या मनात विचार आला की शाहजहानने आग्रा इथंमुमताजसाठी ताजमहाल बांधला. पण मी एक छोटा माणूस आहे, मी माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ एक छोटेसे मंदिर बांधून तिची पूजा करीन. मी माझे संपूर्ण आयुष्य तिच्या आठवणीत घालवीन, असं रामसेवक म्हणतात.

आयुष्यभर प्रत्येक वाटेवर तिने मला साथ दिली आहे. मी तिला मरेपर्यंत साथ देईन आणि मंदिर बांधून इथेच राहू लागलो. आजही ती माझ्यासोबत राहते असं मला वाटतं. मी कधीच नाराज होत नाही. तिची सावली नेहमी माझ्यासोबत असते. मी इथंच राहून तिची पूजा करतो. मी सकाळ संध्याकाळ तिची काळजी घेतो, असं रामसेवकने सांगितलं.

रामसेवक म्हणाले की, पत्नीमध्ये अनेक गुण असतात. पहिला गुण म्हणजे तिच्या वडिलांनाही बहीण नव्हती, त्यांचा जन्म पाचव्या पिढीत झाला होता. पाच भावांमध्ये ती सर्वात लहान होती. दुसरं म्हणजे, तिचा जन्म मे महिन्यात झाला. विवाह मे महिन्यात झाला. मे महिन्यातच तिचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT