Beer Yoga 
Trending News

Beer Yoga: बिअर पीत केली योगासनं! 'या' ठिकाणी साजरा झाला अजब सोहळा; Video Viral

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी शांत बसतील ते कसले?

सकाळ डिजिटल टीम

Beer Yoga: शाररिक तंदुरुस्ती आणि भारताच्या आध्यात्मिक क्षेत्रात महत्वाचं स्थान असलेली योगासनं करण्याचे ठराविक नियम आहेत. पण हीच योगासनं जेव्हा थंडगार बिअरचे घोट घेत कोणी सादर करत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? कदाचित तुमचा संताप होईल किंवा उत्सुकतेपोटी हा प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कराल.

पण बिअर पिताना सामुहिक योगासनं करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकरी शांत बसतील ते कसले? यावर एकामागून एक भन्नाट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. (VIDEO Dozens of people gather to perform yoga by cans of crisp cold refreshing beer in hand)

एएफपी न्यूज एजन्सीनं हा बिअर पिताना योगासनं करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन का करण्यात आलं? याचं स्पष्टीकरणही आयोजकांनी दिलं आहे. ज्या व्हिडिओची आपण चर्चा करत आहोत तो डेन्मार्क या देशातील आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हार्बर इथं हा कार्यक्रम पार पडला.

यामध्ये सुमारे १०० लोकांनी एकत्र येत योगासनांचं सादरीकरण केलं. पण यातलं विशेष म्हणजे प्रत्येकाच्या हातात एक चिल्ड बिअरचा कॅन होता. ही कृती करताना या लोकांना सूचना दिल्या जात होत्या की, "लोकांनी या नव्या योगासनांचा आनंद घ्यावा. यासाठी आपल्या शरीराला लवचिकता देताना बिअर प्यायची आहे पण ती सांडणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे" (Viral Video)

या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं की, "लोकांना चांगलं फ्रेश वाटावं, त्यांनी हसावं तसेच त्यांना चांगला अनुभव मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये केवळ बेसिक योगासनांचा समावेश आहे. ही योगासनं करताना आम्ही बिअर पीत होतो तर कधी मध्ये ब्रेक घेतल्यानंतर पीत होतो" मला वाटतं हा मजेशीर आणि काहीतरी वेगळा अनुभव होता. यामुळं लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं. हे करताना त्यांच्या शरिराला काहीतरी वेगळा अनुभव मिळत होता, जो त्यांनी यापूर्वी कधीही घेतलेला नाही" (latest marathi News)

यामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी एकानं सांगितलं की, "माझ्या काही मित्रांनी मला या छोट्याशा कार्यक्रमाबद्दल सांगितलं. जो मोफत होता आणि तिथं बिअरही मिळणार होती. मग यामध्ये सहभागी का व्हायला नको? असं ठरवून मी सहभागी झालो. पण हा अनुभव खूपच छान होता. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बिअर पीत योगासनं करण्याचा आनंद काही औरच होता," असंही या सहभागीचं म्हणणं होतं.

हा बिअर पीत योगसानं करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला ८३,००० व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी कमेंट्समध्ये हा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. एका व्यायामापेक्षा ते खूप काही आहे कारण जे तुम्हाला थेट देवाशी जोडतं.

तसेच जीवनात तुम्हाला अधिक आध्यात्मिक बनवतं असंही यामध्ये म्हटलं आहे. एका युजरनं म्हटलं की, तुम्ही योगासोबत हे काय केलं आहे. आम्ही तर इटालियन पिझ्झासोबतही कधी इतक्या व्हरायटी तयार केलेल्या नाहीत. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, अशा प्रकारचा बिअर योगा पहिल्यांदा जर्मनीत प्रसिद्ध झाला. त्यानंतर हा प्रकार ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतही प्रसिद्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT