Viral video of Indigo Flight Sakal
Trending News

Viral Video : हे काय चाललंय? इंडिगो विमान कंपनीवर प्रवासी संतापले; व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

इंडिगोने स्पष्टीकरण दिलं पण तरी प्रवाशांचं समाधान झाल्याचं दिसत नाही.

सकाळ डिजिटल टीम

इंडिगो या विमानसेवा कंपनीवर सध्या सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागली आहे. याचं कारण म्हणजे एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे आता सोशल मीडिया युजर्स संतापले आहेत. असं काय आहे या व्हिडीओमध्ये? जाणून घ्या...

सोशल मीडियावर इंडिगो विमानातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये इंडिगोचा स्टाफ निष्काळजीपणाने प्रवाशांचं सामान हाताळताना दिसत आहे. प्रवाशांचं सामान बॅगेत फेकताना हा स्टाफ दिसत आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी आपले अनुभव सांगितले आहेत.

काही जणांनी इंडिगो विमान कंपनीच्या या निष्काळजीपणावर टीका केली आहे. काही जणांनी आपले सामान कधीच योग्य जागी पोहोचलं नाही, ते प्रवासात गहाळ झालं, असे अनुभवही सांगितले आहेत. तसंच आपल्या सामानातल्या नाजूक किंवा काचेच्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचंही प्रवाशांनी सांगितलं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर इंडिगोने याविषयी उत्तरही दिलं आहे.

प्रवाशांचं सामान निष्काळजीपणे हाताळण्याच्या आरोपाबद्दल स्पष्टीकरण देताना इंडिगोने सांगितलं की, व्हिडीओमध्ये दिसणारे बॉक्सेस हे प्रवाशांचं सामान नाही. ते हलके आणि न तुटण्याजोगे सामान आहे. पण तरीही या स्पष्टीकरणावर प्रवाशांचं समाधान झालेलं दिसत नाही. बॅग प्रवासादरम्यान तुटल्याची तक्रारही एका युजरने केली आहे. आपण या विषयात लक्ष घालू असं उत्तर इंडिगोने याविषयी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT