Video Viral
Video Viral  esakal
Trending News

Video Viral : एक रुपयाही न घेता पॅशन जपत 4 वर्षांपासून काम करतेय, तिच्या कामाला लोकांचा सलाम

साक्षी राऊत

Video Viral : एका तरुणीच्या उल्लेखनिय कामगिरीची छाप सध्या लोकांच्या मनावर आहे. हावभाव करत लोकांना वाहतुकीचे नियम शिकवणाऱ्या या तरुणीने लोकांच्या मनावर तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या माध्यमातून राज्य केलंय. तिच्या कामगिरीचा आढावा थोडक्यात घेऊया.

लहानपणापासूनच टीव्हीवर करेक्ट ७ वाजता सुरु होणाऱ्या सीरीयलमधील चंद्रमुखी चौटाला हे कॅरेक्टर या तरुणीच्या आवडीचं होतं. त्यामुळे लहानपणीच मला पोलीस ऑफिसर व्हायचंय असे स्वप्न तिच्या मनात होते.

मात्र जसजशी ती मोठी झाली, तिच्या आयुष्याचा आणि तिच्या स्वप्नांचा योग्य ताळमेळ जुळला नाही आणि तिचं पोलीस बनण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहीलं. मात्र MBA करत असताना तिने इंदौर ट्राफिक पोलिसांचा एक कार्यक्रम बघितला आणि त्यात सहभाग घेण्याचे ठरवले. या कार्यक्रमात पोलिस प्रशासनाकडून कुठलेही प्रमाणपत्र किंवा पैसे मिळणार नव्हते मात्र या कार्यक्रमाच्या रुपातून तिचे स्वप्न सत्यात उतरणार होते. तिने ट्राफिकबाबत जनजागृती करणाऱ्या या कार्यक्रमात भाग घेतला आणि ट्राफिक पोलीसांची भूमिका साकारली.

ट्राफिक पोलिसांचा जॉब वाटतो तेवढा साधा नसतो. त्यांना वेगवेगळ्या लोकांचा स्वभाव, त्यांचे वागणे यांना हँडल करावे लागते. काहीवेळा लोकांच्या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांच्या रागाचा संयम सुटतो. दिवसभर थकून घरी गेल्यानंतर त्यांना आणखी कोणाचे ओरडणे नको वाटते. मात्र तिच्या मते ट्रॅफिक पोलीस आणि लोकांमध्ये एक मैत्रिपूर्ण नाते असावे असे कायम तिला वाटायचे.

पहिल्या २० दिवसांत तिने अगदी चेहऱ्यावर स्मित हास्य देत लोकांना ट्राफिक रूल पाळण्यास सांगेल असे ठरवले. सिग्नल लागल्यानंतर अवघ्या २ मिनिटांच्या कालावधीत रस्त्याची वाहतुक सुरळीत चालावी यासाठी धडपड करावी लागते. ती तिने केली. अवघ्या चार दिवसांत तिने रस्त्यावर लोकांच्या मनात तिची छाप सोडली. आणि वाहतुक नियम तोडणाऱ्यांची संख्याही कमी झाली. (Social Media)

एका सिनीयर ऑफिसरला तिने तिच्या या कार्याचा व्हिडीओ बनवण्यास सांगितले होते. हा व्हिडीओ तिला तिच्या आई-वडिलांना दाखवायचा होता. मात्र दुसऱ्या दिवशी तिचा व्हिडीओ इंटरनेटवर कोणीतरी पोस्ट केला आणि व्हायरल झाल्याचे तिला कळले. (Video Viral)

ही तरुणी मागल्या चार वर्षापासून ट्राफिक पोलीस विभागाकडून एक पैसाही न घेता तिच्या आनंदासाठी आणि पॅशनसाठी काम करतोय. एके दिवशी ट्राफिकमध्ये ती उभी असताना एका ७५ वर्षाच्या वृद्ध माणसाने तिला कुरवाळत, फार चांगलं काम करतेस म्हणत तिच्या डोक्यावरून आशीर्वाद देत हात फिरवला. तिचे अश्रू त्यावेळी अनावर झाले होते. मात्र तिच्या कामाचे समाधानही तिला तेवढेच वाटत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT