Viral  esakal
Trending News

Viral : म्हैस नाही तर हत्ती हाय रे ते; फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मिळ क्षण!

फोटोग्राफर सचिन भराली यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे

सकाळ डिजिटल टीम

Viral : नदीच्या काठावर बसलेला मालक म्हशींना पाण्यात सोडून निवांत बसतो. म्हशींच मनसोक्त डुंबुन झालं की त्या आपोआप बाहेर येतात. पण त्या वेळेत त्या मस्त पाण्यावर तरंगत असतात. तसाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पण, लांबून काळ्याभोर दिसणारे हे प्राणी म्हशी नसून चक्क हत्ती आहेत.

हत्ती पाण्यात पोहतात हे आपल्याला माहिती आहे. पण इतक्या जास्त प्रमाणात ते नदी ओलांडून पलिकडे जात नाहीत. असे क्वचित दिसणारे दृश्य एका फोटोग्राफरने कॅमेऱ्यात कैद केले आहे.

फोटोग्राफर सचिन भराली यांनी टिपलेल्या चित्तथरारक ड्रोन फुटेजमध्ये, हत्तींचा कळप आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या खोल पाण्यात पोहताना दिसत आहे. आसामच्या मुख्य बंदरांपैकी एक असलेल्या निमाती घाटावर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये हत्ती खोल नदीत पोहताना त्यांच्या शरीराचा फक्त वरचा भाग दिसत आहे. त्यामुळे या म्हैशी आहेत की हत्ती असे कोडेच पडले आहे.

या व्हिडिओने बऱ्याच लोकांना आश्चर्यचकीत केले आहे. हत्ती पाण्यात पोहू शकत नाहीत या सामान्य समजुतीला हा व्हिडिओ आव्हान देतो. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला असून तो ४.२ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पॉझिटिव्ह प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही लोकांनी असं चित्र क्वचित पहायला मिळत असं सांगितलं. तर , काहींनी या व्हिडिओला अवॉर्ड विनिंग शॉट म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT