Viral  esakal
Trending News

Viral : पिक्चरमधील स्टोरी सत्यात उतरली; गरीबाच्या घरी वाढलं कोट्याधिशाचं पोरं, ३० वर्षानंतर…

एका कुटुंबातील महिलेने प्री-मॅच्युअर बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पण...

सकाळ डिजिटल टीम

Viral News :

७०-९० च्या दशकातील अनेक चित्रपट हे कुंभमेळ्यात, जत्रेत हरवलेल्या मुलांच्या जीवनावर आधारीत होते. कारण, तेव्हा चित्रपटातील हरवलेली मुलं पालकांना तरूणपणात भेटतात, अशा आशयाचे अनेक चित्रपट आहेत. पण ही कथा सत्यात उतरली आहे.

एका कुटुंबातील महिलेने प्री-मॅच्युअर बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पण ३० वर्षानंतर ते बाळ पुन्हा समोर आले. काय आहे ही घटना, कुठे घडलीय हे जाणून घेऊयात.

ही गोष्ट आहे चीनमधील झेजियांग प्रांतातील. इथे राहणाऱ्या एका महिलेची वेळेआधीच प्रसुती झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी हे बाळ मृत झाल्याचे घोषित केले. पण, ते बाळ जिवंत होते. डॉक्टरांनी तेव्हा हे बाळ त्यांच्याच नात्यातील एका महिलेला दिले. कारण, त्या महिलेला शारीरिक व्याधींमुळे कधी बाळ होणार नव्हते. त्यामुळे, डॉक्टरांनी ते बाळ तिला दिले.

डॉक्टरांच्या नात्यातील ती महिला गरीब होती. तिने मुलाला गरीबीत वाढवले. त्याचे संगोपन केले. तो मुलगा ३० वर्षाच्या झाल्यानंतर तिने त्याला सत्य सांगितले. की तू आमचा मुलगा नाहीस, तुझे खरे आई वडील वेगळेच आहेत.    

हा गडगंज श्रीमंताचा मुलगा असूनही त्याने गरीबीत दिवस काढले. त्याला वयाच्या १७ व्या वर्षीच कॉलेज सोडावं लागलं. कारण, त्याच्याकडे फि भरण्यासाठी पैसे नव्हते. या मुलाचे नाव झांग असे ठेवण्यात आले होते. झांग त्याच्या आई-वडीलांपासून ४०० किलोमीटर अंतरापासून दूर असलेल्या गावात होता.  

खऱ्या वडिलांनी झांगला पाहताच तो खूप आनंदी झाला. तो म्हणाला की माझ्या मुलाने त्याच्या आयुष्यातील 30 वर्षांहून अधिक काळ त्याचा वाढदिवस आमच्याशिवाय साजरा केला. या वर्षी आपण त्याचा वाढदिवस एकत्र साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT