Viral News esakal
Trending News

Viral News : ऐकावं ते नवलच! शाकाहारी उंटाला खाऊ घालतात किंग कोब्रा, कारण...

दिवसेंदिवस काही न खाता पिता राहणारा उंट शाकाहारी प्राणी आहे. पण काही विशिष्ट प्रसंगी त्याला साप खाऊ घातला जातो आणि तो खातो ही, काय आहे कारण, जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Vegetarian Camel Eating King Cobra : वाळवंटाचे जहाज म्हटला जाणारा उंट हा प्राणी आपण सर्वांनीच कधी ना कधी बघितलेला असतो. हा प्राणी वाळवंटात राहत असला तरी झाडांची पानं, फुलं खातो. त्याचा महत्वपूर्ण भाग हे त्याचं कुबड असतं. उंट याच भागात चर्बी साठवून ठेवतात. त्यामुळेच ते महिनोन् महिने पाणी आणि अन्ना शिवाय राहू शकतात.

अशा शाकाहारी प्राण्याला विषारी साप का खाऊ घातला जातो? जाणून घ्या

उंटाला एक विशिष्ट आजार झाला की, तो खाणं-पिणं सोडून देतो. शरीर सुकायला लागतं. यावर मध्यपूर्वेत असं मानलं जातं की, यावेळी जर उंटाला विषारी साप खाऊ घातला तर तो बरा होईल. म्हणून उंटाचं तोंड उघडून साप टाकला जातो आणि लगेच पाणी पाजलं जातं, त्यामुळे साप आत जातो.

धार्मिक मान्यता

या प्रकारामागे धार्मिक समज आहे. या आजाराला Hyam म्हटलं जातं. याचा अर्थ जिवंत साप गिळणे असा होतो. विषरी साप खाऊ घातल्यावर असं मानलं जातं की, त्याचं विष उंटाच्या शरीरात पसरतं, जेंव्हा त्याचा प्रभाव कमी होतो तेंव्हा उंटपण बरा होऊ लागतो. पण यामागे काणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.

डॉक्टर याला करतात अमान्य

जनावरांचे डॉक्टर म्हणतात की, उंटांना हा आजार किड्यांच्या चावण्याने होतात. यामुळे उंटांचा गर्भपात व मृत्यू पण होऊ शकतो. याचे लक्षण ताप, डोळ्यांतून सतत पाणी गळणे, अशक्तपणा, शरीर फुगणे, शक्ती कमी होणे इत्यादी आहे. उपचार न मिळाल्याने Trypanosomiasis ने उंटाचा मृत्यू होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT