Viral Prescription  Esakal
Trending News

Viral Prescription: ओ डॉक्टर साहेब हे काय केलयं? व्हायरल औषधांची चिठ्ठी पाहून तुम्ही लावाल डोक्याला हात

Viral Prescription: येथे त्यांनी डॉक्टर अमित सोनी यांची भेट घेतली. रुग्णाने डॉक्टरला सांगितले त्याच्या हृदयाजवळ वेदना होत असतल्याने तो चिंतेत आहे.

आशुतोष मसगौंडे

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये असे औषध लिहिले की, ते वाचून रुग्णासह मेडिकल स्टोअरचालकही चक्रावून गेला.

नागौड येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाने खासगी दवाखान्यात उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर संतापलेल्या सरकारी डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शनमध्ये असे शब्द लिहिले जे कोणत्याही मेडिकल स्टोअरच्या फार्मासिस्टला समजू शकले नाहीत. दरम्यान सोशल मीडियावर हे प्रिस्क्रिप्शन तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रहिकवाडा येथील रहिवासी अरविंद कुमार सेन हे कुटुंबीयांसह नागौड येथील सरकारी रुग्णालयात गेले होते. येथे त्यांनी डॉक्टर अमित सोनी यांची भेट घेतली. रुग्णाने डॉक्टरला सांगितले त्याच्या हृदयाजवळ वेदना होत असतल्याने तो चिंतेत आहे.

शारीरिक चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला त्यांच्या खाजगी दवाखान्यात येण्यास सांगितले. मात्र रुग्णासोबत उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी आर्थिक परिस्थिती सांगत याला नकार दिला. त्यांनी डॉक्टरांना इथूनच प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याची विनंती केली.

मात्र यामुळे डॉक्टर सोनी नाराज झाले. त्यांनी घाईघाईने आणि बेतालपणे प्रस्क्रिप्शनवर काही आकडे काढले.

प्रिस्क्रिप्शन देताना मेडिकलच्या डॉक्टरांना औषध घ्यायला सांगून ते निघून गेले. यानंतर रुग्ण औषध घेण्यासाठी बाहेर पडले असता एकाही मेडिकल स्टोअरचालकाला प्रिस्क्रिप्शन वाचता आले नाही. कारण प्रिस्क्रिप्शनमध्ये कोणतीही औषधे लिहिलेली नव्हती. मात्र एका मेडिकल ऑपरेटरने हे प्रिस्क्रिप्शन पाहून व्हायरल केले आहे.

ही बाब गांभीर्याने घेत सतना येथील मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी यांनी गंभीर दखल घेत संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावून खुलासा मागवला आहे.

या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांच्या हस्ताक्षराबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे, कारण अयोग्य हस्ताक्षर रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही अडचणीचे ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

Sangola FDA Raid: सांगोल्यात एफडीएची मोठी कारवाई! ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त; १५ लाखांचा साठा जागेवरच नष्ट

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

SCROLL FOR NEXT