Viral video of baby elephant Sakal
Trending News

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

Viral video of baby elephant running to humans after separation: सोशल मिडियावर एका हत्तीच्या पिल्ला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो त्याच्या आईपासून वेगळा झाला आहे, ज्यामुळे तो घाबरुन माणसांकडे मदत मागत आहे असे दिसत आहे. पुढे काय होते हे व्हिडिओत पाहा.

पुजा बोनकिले

Baby elephant crying viral clip: सोशल मिडियावर विविध प्राण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील आहे. हा हत्तीचा पिल्लू आईपासून दूर झाला असून तो इकडे तिकडे मदत मागताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ निवृत्त भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावनिक व्हाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की एक हत्तीचा पिल्लू आईपासून वेगळा झाला आहे, तो वन अधिकाऱ्याकडे मदत मागत असे दिसते. नंतर तो अधिकारी हत्तीच्या पिल्लाला हात लावतो, नंतर तो हत्तीच्या पिल्लाला आई हत्तीशी भेट करुन देतो.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओची सुरुवात हत्तीचे बाळ घाबरलेले आणि गोंधळलेले, वेडेपणाने गाडीभोवती फिरत, वास घेत आणि वेगाने फिरत, त्याच्या आईला शोधण्यासाठी हताश होते. पुढे, वन पथक काळजीपूर्वक त्या लहान हत्तीला त्या भागात घेऊन जाते जिथे त्याची आई शेवटची दिसली होती. आईने तिच्या पिल्लाला ओळखले सोबत घेऊन जाते. यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्याने मदत केली आहे.

या व्हिडिओने सोशल मीडियावर हजारो लोकांचे लक्ष वेधून घेतले. "किती सुंदर व्हिडिओ आहे. काझीरंगा शब्दांपलीकडे सुंदर आहे. कमी मानवी वस्ती आणि जवळपास व्यापारीकरण असल्याने ते असेच राखले पाहिजे," एका नेटकऱ्याने लिहिले. "ओले बाबा, तो खूप गोंडस आहे. मी काझीरंगाजवळ वाढलो हे माझे भाग्य होते. तर अनेक यूजर्सने लव्ह आणि स्मायली इमोजी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपायुक्तच बनल्या मालकीणबाई? मसाज, भांडीकुंडी अन् धमक्या… व्हिडिओ व्हायरल! सफाई कामगार महिलेचे धक्कादायक आरोप

समलैंगिक संबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; CAची आत्महत्या; 22 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक

शिक्षक मुंबईत! 'आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे हाल; शाळा बंदच्या निर्णयावर ठाम'; राज्य सरकारकडून निघाला नाही तोडगा

मंदिराचा पदाधिकारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायचा; तिरुपती देवस्थानने केली मोठी कारवाई

PMC Development : रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार; कृती पथकाची निर्मिती; कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT