Viral Video Sakal
Trending News

Viral Video : छत्री घेऊन केले लग्नाचे विधी; लग्नासाठी 'कायपण' करणारे नवरा-नवरी व्हायरल

लग्नसोहळा म्हणजे वधूवराच्या दिवसातला महत्त्वाचा दिवस असतो. आता हा दिवस पावसाळ्यात आला तर? तर भंबेरी उडण्याची शक्यता जास्त असते.

वैष्णवी कारंजकर

सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ ट्रेंडिगमध्ये असतो. लग्नाचा सीझन असल्यामुळे लग्न सोहळ्यांमधले व्हिडीओही सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. कुठे नवरा-नवरीचा डान्स फेमस होतोय, तर कुठे भांडणं होतायत, त्यांचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

लग्नसोहळा म्हणजे वधूवराच्या दिवसातला महत्त्वाचा दिवस असतो. आता हा दिवस पावसाळ्यात आला तर? तर भंबेरी उडण्याची शक्यता जास्त असते. या व्हिडीओमध्ये नवरा-नवरीची धांदल उडलेली दिसत आहे. लग्नाच्या विधीदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. विधी सुरू असतानाच मांडवात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या नवरा-नवरीने चक्क हातात छत्री घेऊन सप्तपदी घेतली आहे.

या व्हिडीओमध्ये आणखीही काही लोकांचे आवाज ऐकून येत आहेत, ज्यामध्ये हे लोक दोघांच्याही सप्तपदीसाठी घाई करताना दिसत आहेत. तसंच काही लोक या लग्नाची चांगलीच थट्टाही करत आहे. हा व्हिडीओ मध्यप्रदेशातला असल्याचं सांगण्यात येत आहे. लग्नाचे विधी सुरू असतानाच ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि तुफान पावसाला सुरुवात झाली.

त्यामुळे दोघांना छत्री घेऊन सप्तपदी घ्यावी लागली, तर दुसरीकडे गुरुजी आडोशाला उभं राहून मंत्र पठण करत होते. हा व्हिडीओ पाहणारे लोक नवरा नवरीच्या इच्छाशक्तीचंही कौतुक करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT