Trending News

Viral Video : 'आता विमल अन्...' चाय आइस्क्रीम पाहून भडकले यूजर्स

सकाळ डिजिटल टीम

Bizarre Food Combination : गेल्या काही वर्षांत फ्यूजन फूड ट्रेंडची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात इंटरनेटवर फूड पेअरिंगच्या बाबतीत क्रिएटिविटीची कमतरता नाहये. अनेक फूड ब्लॉगर्सनी बाजारात विचित्र पण मनोरंजक फूड कॉम्बिनेशन्स आणून हे सिद्ध केले आहे.

या विचित्र फूड कॉम्बिनेशनचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आपल्या पाहण्यात येत असतात. असाच एक विचित्र व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्सने संताप व्यक्त केला आहे. भारतीय लोकांना चहा प्यायला खूप आवडते. आज आम्ही तुम्हाला चहापासून बनवलेल्या फूड कॉम्बिनेशनचा व्हिडिओ दाखवणार आहोत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये चहा आणि आईस्क्रीमचे मिश्रण करण्यात आले आहे. हे कॉम्बिनेशन सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडील असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. Mi_nashikkar याफेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये एक विक्रेता बर्फाच्या तव्यावर गरम चहाचा कप ओतताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर तो यात दूध आणि चॉकलेट सिरप घालतानाही दिसून येत आहे. थोड्या अंतराच्या फरकाने हा विक्रेता आईस्क्रीमसह चहा ओतून रोल बनवत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो कमेंट मिळाल्या आहे.

आइस्क्रीम रोल्स ही थायलंडची गोड डिश आहे. थाई डेझर्टवर हे देसी आइस्क्रीम ट्विस्ट कोणत्याही डिशइतकेच फ्यूजन आहे. मात्र, भारतीय या अनोख्या स्वादिष्ट पदार्थाने प्रभावित झालेले नाहीत. या विचित्र फ्यूजनला अनेक यूजर्सने तिखट प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, विमल आणि रजनीगंधा एकत्र केलेले आईस्क्रिमही बनवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT