Bears Viral Video esakal
Trending News

Bears Viral Video : असं कसं शक्यय? अस्वल उभं राहिलं दोन पायांवर... प्राणिसंग्रहालयाचं स्पष्टीकरण, व्हायरल होतोय व्हिडिओ

चीन मधल्या एका प्राणीसंग्रहालयात एक अस्वल चक्क माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला.

धनश्री भावसार-बगाडे

Bear Standing On His Two Feet Like A Man Viral Video :

वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयांमधल्या प्राण्यांचे चित्रविचित्र, कधी धक्का दायक, विनोदी व्हिडीओज सतत व्हायरल होत असतात. त्यांचा मनसोक्त आनंदसुद्धा लोक घेतात. पण काही व्हिडीओज खरच विचारात पाडतात आणि निसर्गाच्या आश्चर्यांवर विचार करायला लावतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रेक्षकांच्या गर्दीकडे बघत एक अस्वल दोन पायांवर उभा दिसत आहे.

चीनच्या हँग्झूम झू या प्राणीसंग्रहालयातल्या या काळ्या अस्वलाचा दोन पायांवर उभे राहून प्रेक्षकांकडे बघत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत चक्क अस्वल मागच्या दोन पायांवर उभा असल्याचं दिसत आहे. आणि प्रेक्षकांकडे बघून जणू संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. एका जंगली प्राण्याने जो चार पायांवर चालतो त्याने दोन पायांवर उभे राहणे ही घटना आश्चर्यकारक वाटते.

असे फक्त कार्टून अॅनिमेशनमध्येच बघायला मिळते. शिवाय या जंगली प्राण्याचे धीटाइने प्रेक्षकांकडे बघत उभे राहणे यामुळेही लोकांना आश्चर्य वाटले. त्यामुळे हा खरा अस्वल नसून प्राणीसंग्रहालयातल्या एखाद्या कर्मचाऱ्याने अस्वलाचे चुकीच्या फिटींगचे कपडे घातले असल्याची अफवा सगळीकडे पसरली.

या अफवेचा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असल्याने प्राणीसंग्रहालय प्रशासनाला याचा खुलासा करणारे ट्वीट करावे लागले आहे. त्यात त्यांनी तो अस्वल स्वतःच उत्तर देत असल्याप्रमाणे लिहिले आहे की, "मी अँजला आहे. मी एक सन बेअर आहे. मला काल प्रशासनाकडून फोन आला की, मी आळशी झाला असून काम टाळत आहे का? आणि माझी जागा एका माणसाला घेण्याची गरज पडत आहे. मी कोणीही अस्वलाचे कपडे घातलेला कर्मचारी नाही."

प्रशासनाने केलेले हे रिट्वीटसुद्धा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावरही लोक भरभरून कमेंट आणि लाइक्स करत आहेत.

नेटकरी प्रशासनाने केलेल्या या रिट्वीटवरही टिका करत आहेत. या ट्वीटमध्ये अस्वलाच्या नावे दिलेली वाक्ये ही सुद्धा जणू तो एक कर्मचारी असल्याप्रमाणे दिली आहेत. उलटपक्षी तो अस्वल म्हणजे केवळ एक बिचारा बंदीवान आहे, अशा कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT