Viral Video esakal
Trending News

Viral Video : आई बेशुद्ध पडली, बाबा ढसाढसा रडले; मुलीला UPSC परीक्षेला बसू न दिल्याने पालकांचा आक्रोश!

आईला चक्कर आली आणि बाबा रडत आहेत, हे पाहून ती विद्यार्थींनी घाबरली

सकाळ डिजिटल टीम

Viral Video :

मुलांच्या परीक्षा सुरू असताना पालकांचीही धावपळ सुरू असते. विद्यार्थ्यांसोबत राहणे, अभ्यासाला उठवणे, परीक्षा केंद्रावर नेऊन सोडणे हे सर्वच पालक करतात. पण आज एका पालकांनी परीक्षा केंद्रातच आक्रोश करावा लागला. त्याचे कारणही तसेच होते.

UPSC परीक्षेच्या परीक्षा केंद्राबाहेर पालक रडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ 16 जून रोजी झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 2024 च्या प्राथमिक परीक्षेचा आहे. या विद्यार्थ्याचे पालक परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारात उभे राहून आपल्या मुलीला प्रवेश देण्याची विनंती करत होते.

हे प्रकरण एसडी आदर्श स्कूल, सोहना रोड, गुरुग्रामचे असल्याचे सांगितले जात आहे. UPSC परीक्षेदरम्यान एका विद्यार्थीनीला काही कारणांमुळे उशीर झाला. जेव्हा ती तिच्या पालकांसह परीक्षा केंद्रावर पोहोचली तेव्हा UPSC नियमानुसार प्रवेशद्वार बंद होते. गेट बंद पाहून मुलीच्या आई-वडिलांना आपल्या मुलीचे वर्ष वाया जाणार म्हणून काळजी वाटली.

गेट बंद पाहून मुलीच्या आई-वडिलांना आपल्या मुलीचे कसे होणार, तिने घेतलेली मेहनत वाया जाणार हे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. इतकेच काय तर तिची आई गेटवरच चक्कर येऊन पडली.  

आईला चक्कर आली आणि बाबा रडत आहेत, हे पाहून ती विद्यार्थींनी घाबरली. तरीही ती वडीलांना धीर देत होती. बाबा तुम्ही असं वागू नका, रडू नका. पाणी प्या आणि शांत व्हा. माझे वर्ष वाया गेले तर जाऊदेत. मी पुढील वर्षी आणखी मेहनत करून ही परीक्षा देईन.

आईवडीलांची अशी समजूत ही मुलगी घालत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच गुरुग्राम पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांना समजावून सांगून त्यांना परत पाठवले.

एका 'एक्स' वापरकर्त्याने या घटनेचा व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर शेअर केला आणि लिहिले, एक हृदयद्रावक व्हिडिओ आहे, आपल्या मुलीला उशिरा आल्याने प्रवेश न मिळाल्याने आज यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी आपल्या मुलीसोबत आलेल्या पालकांची अवस्था झाली. परीक्षा सकाळी 9:30 वाजता सुरू होते. पण हे पालक थोडे उशीरा आले.

UPSC नियमानूसार आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी त्यांना आत जाऊ दिले नाही, कारण,परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी गेट बंद करणे हा यूपीएससीचा नियम आहे. अशी माहिती एक्सवर देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Student Protest: भीतीपेक्षा मोठा होता विद्यार्थ्यांचा आवाज! घरच्यांना न सांगता जंतरमंतरवर पोहोचली नम्रता; आंदोलनात झाली सहभागी

Mumbai Rain: मुंबईकरांची जीवनवाहिनी कोलमडली! विरार-डहाणू लोकलसेवा पूर्णतः बंद; प्रवाशांचे हाल

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

SCROLL FOR NEXT