Viral Video esakal
Trending News

Viral Video : 'स्कूल चले हम'; पाठीवर दप्तर टाकून कुत्रे पाहतायत स्कूल बसची वाट

School Bus ची वाट पाहतानाचा कुत्र्यांचा Video Viral, पाठीवर बॅग घेऊन लावल्या रांगा

सकाळ डिजिटल टीम

Dogs Waiting For School Bus : पाळीव प्राणी त्यातही कुत्रे आणि मांजरांवर लोकांचे विशेष प्रेम असते. त्यामुळे त्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये कुत्र्यांचा अंदाज पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कुत्रे लहान मुलांसारखे स्कूल बसची वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे एका पाठोपाठ एक असे रांगेत उभे असताना दिसत आहेत. पाठीवर स्कूल बॅग आणि गळ्यात पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेला दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दहा कुत्र्यांचा एक गट बसची वाट पाहताना दिसत आहेत. वेगवेगळ्या जातीचे कुत्रे एका कार्पेटवर बसलेले दिसत आहेत. ट्विटरवर Buitengebieden नावाच्या युजर्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कुत्रे स्कूल बसची वाट पाहात आहेत".

हा व्हिडीओ 2.6 दशलक्षहून अधिक वेळा पाहिला असून 83 हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. 6,500 हून अधिक वापरकर्त्यांनी पोस्ट रिट्विट केले आहे. तर अनेकांनी व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

एका यूजरने लिहिले की, 'त्या कुत्र्यांच्या गोंडस बॅग पाहा.' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'आश्चर्यकारक आहे की त्यांनी पिवळा स्कार्फ कसा घातला आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'कुत्रे नेहमी माणसांचे ऐकतात, त्यांना फक्त प्रशिक्षित करण्याची गरज आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT