Fight Due to Chicken Leg Pies In Marriage sakal
Trending News

Viral Video : बिर्याणीतून लेगपीस गायब! लग्नातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Fight Due to Chicken Leg Pies In Marriage: विधिवत विवाह सोहळा पार पडला. लग्न लागले आणि सगळे लोक आपापल्या घरी परत गेले

Chinmay Jagtap

Uttar Pradhesh Viral Content: भारतीयांचं आपल्या जेवणावर विशेष प्रेम असतं. त्यात जर जेवण नॉनव्हेज असलं तर विषयच संपतो. आणि नॉनव्हेजमध्ये ही जर बिर्याणी असली तर मजा वेगळीच. सध्या असाच बिर्याणीमध्ये लेग पिसं नसल्यामुळे भांडण झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका लग्नामध्ये बिर्याणीमध्ये लेग पिसं नसल्यामुळे पाहुण्यांमध्ये भांडण झाले आणि मग या भांडणाला हिंसक वळण आलं.उत्तर प्रदेशातील नवाबगंज येथे सरताज मॅरेज हॉलमध्ये ही घटना घडली आणि कॅमेरात कैद झाली.वधूच्या बाजूने या भांडणाला सुरुवात झाली. यानंतर मान अपमान नाट्य रंगू लागलं.

साध्या बिर्याणी वरून सुरू झालेल्या या वादाने दोन कुटुंबामध्ये भांडण लावलं. वायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पाहुणे एकमेकांवर लाथा बुक्क्याचा मारा करत आहेत.खुर्च्या फेकून मारत आहेत.

एका वृत्तानुसार झालेल्या गोंधळानंतर वर म्हणजेच नवरोबा चांगलाच संतापला. 'मी हे लग्न करणार नाही असे त्याने जाहीर केले. मात्र काही वेळाने वधुपक्षातील वडीलधाऱ्यांनी पुढे येऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि लग्न कार्य पूर्ण करा अशी विनंती वरपक्षाला केली.

अखेर नवऱ्याने लग्न करण्याचे मान्य केले. कुटुंबामध्ये समेट झाला. विधिवत विवाह सोहळा पार पडला. लग्न लागले आणि सगळे लोक आपापल्या घरी परत गेले. पाहुणेही या ठिकाणी पोटभर जेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates: काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून दहिसर परिसरात गुंडागर्दी

Arts Centre: बहुतांश कलाकेंद्रांत लावणीच्या नावावर बैठकाच! 'साेलापूर जिल्ह्यातील २६ केंद्रांना कायमस्वरूपी प्रमाणपत्रे'; पोलिसांकडून कारवाई गरजेची

Wrestling Championship: वजन जास्त भरल्याचा पुन्हा एकदा भारतीय कुस्तीपटूला फटका; ऑलिम्पिक पदक विजेता जागतिक स्पर्धेसाठी अपात्र

SCROLL FOR NEXT