Viral Video Of Joe Biden  Sakal
Trending News

Viral Video: जो बायडन यांचा व्हिडिओ का होतोय व्हायरल? G7 शिखर परिषदेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी नेमकं काय केलं? पाहा व्हिडिओ

Viral Video Of Joe Biden: G7 शिखर परिषदेतील अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे दोन व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ते गोंधळलेले दिसत आहे.

पुजा बोनकिले

Viral Video Of Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मिडियात चर्चेत येतात. अलिकडेच झालेल्या G7 परिषदेतही असेच काहीसे घडले होते. सर्वात आधी ते इटलीला पोहोचल्यावर त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना जरा वेगळ्या पद्धतीने सलाम केला. यानंतर फोटो सेशनदरम्यान ते अचानक ग्रुपपासून दूर गेले. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मेलोनीसोबतच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मेलोनी यांना भेटल्यानंतर बायडन स्टेजवर हळूहळू चालताना दिसत आहे. आधी दोघांनी एकमेकांशी काही वेळ गप्पा मारल्या. यानंतर बायडन यांनी कपाळावर हात ठेवला आणि मेलोनी यांना सलाम केला. यानंतर ते हळूहळू स्टेजवरून खाली उतरत होते.

इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना अभिवादन करताना आणि नंतर G7 शिखर परिषदेला निघताना बायडन थोडे गोंधळलेला दिसत होते.

त्याचप्रमाणे दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये पॅराग्लायडर उतरल्यावर सर्व नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले आणि एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, बायडन हसताना आणि हळू हळू दुसऱ्या दिशेने चालताना दिसत आहे. काही अंतर चालल्यानंतर ते उत्साहाने कोणाला तरी थम देताना दिसत आहे. पण कॅमेरा त्यांच्या दिशेने वळताच तिथे कोणीच नसल्याचे दिसून आले. इतर नेतेही बायडनकडे पाहतात. दरम्यान, मेलोनी यांनी त्याचा हात धरून त्यांना इतर नेत्यांच्या दिशेने आणले.

याआधी अलीकडेच, व्हाईट हाऊसमध्ये संगीताच्या कार्यक्रमादरम्यान बायडन काही मिनिटांसाठी गतिहीन दिसले. यावेळी त्यांच्या शेजारी उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि त्यांचे पती नाचत होते. हा व्हिडिओही व्हायरल झाला होता. अशा अनेक घटनांमुळे त्यांच्या विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली आणि सांगितले की, बायडन खूप म्हातारे झाले आहेत. त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT