Viral Video  esakal
Trending News

Viral Video : ‘आधी मसाले टाकले अन् नंतर उकळत्या तेलात तळलं’ पृथ्वीवरील अवाढव्य जीवासोबत त्यानं असं का केलं?

Cooking Snake Video : या व्हिडिओमध्ये साप खाताना दाखवण्यात आलेला नाही. पण बर्नार्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत,

सकाळ डिजिटल टीम

Viral Video :

जगात दोन प्रकारचे लोक असतात ज्यांना साप, अजगर अशा प्राण्यांचा फोबिया असतो. तर काही लोक हौसेने सापांसोबत फोटो काढतात. काही लोक साप पाळतात तर काही साप खातात.

इतर असे लोक आहेत जे या सापांना पाहताच मारतात, नंतर त्यांना शिजवतात आणि खातात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पहिल्यांदा 12 फुटांच्या अजगराला भाजून घेत आहे. त्यानंतर, मसाले घालून ते उकळत्या तेलात फ्राय करत आहे. (Viral Video )

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बर्नार्ड हार्डिसनने त्याच्या @bsdiningexperiencesc अकाऊंटवर शेअर केला आहे. 'रोस्टेड आणि फ्राइड 12 फूट अजगर', असे या  कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही बर्नार्ड या व्यक्तीला त्याच्या घरात 12 फूट लांबीचा अजगर शिजवताना पाहू शकता. त्यांनी हा अजगर लोखंडी शेगडीवर ठेवला आहे. ज्यामध्ये खालून आग येत आहे. त्याने या सापाला मंद आचेवर थोडा तळून घेतला.

नंतर त्यावर हळद आणि मीठ यांचे मसाल्यांचे मिश्रण शिंपडले. बर्नार्डने मसाला शिंपडल्यानंतर हा अजगर उकळत्या तेलात टाकला. अन् नंतर तो साप तळून घेतला.

मात्र, या व्हिडिओमध्ये साप खाताना दाखवण्यात आलेला नाही. पण बर्नार्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत, जे लाखो वेळा पाहिले गेले आहेत.

काही व्हिडिओंमध्ये तो मगरी शिजवत आहे तर काहींमध्ये तो रॅकून आणि बेडूक तळत आहे. मात्र 12 फुटांच्या अजगराचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 कोटी 80 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

त्याचबरोबर लाखो लोकांनी ते शेअर आणि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्सही येत आहेत. या व्हिडिओवर हजारो लोकांनी आपले मत व्यक्त केले आहे. काहीजण साप खाल्ल्यानंतर कसा लागेल असे म्हणत आहेत. तर, काही लोक या प्रकाराला मूर्खपणा म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supe ST Bus Accident : सुपे घाटात एसटी बस उलटून अपघात आठ विद्यार्थी किरकोळ जखमी, दोन गंभीर, उपचार चालू

DengiAll: डेंग्यूला घाबरण्याचे दिवस संपणार? भारताची पहिली स्वदेशी लस ‘DengiAll’ लवकरच येणार

Bombay High Court : चोवीस आठवड्यांनंतर परवानगी बंधनकारक का? गर्भपातासंबंधीच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

SCROLL FOR NEXT