Viral Video Sakal
Trending News

Viral Video: चालत्या रेल्वेतही विकली पाणीपुरी; सोशल मीडियावरुन होतोय कौतुकाचा वर्षाव

इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ सध्या शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

वैष्णवी कारंजकर

पाणीपुरी हे एक असं स्ट्रीट फूड आहे, ज्याचं नाव ऐकूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात गेलात तरी तुम्हाला पाणीपुरीचे चाहते सापडतीलच. आजकाल तर लग्नकार्यामध्येही पाणीपुरीचा स्टॉल लावलेला असतो. तिथेही लोक चवीने पाणीपुरी खातात. पण तुम्ही कधी ट्रेनमध्ये पाणीपुरी खाल्ली आहे का?

नुकतंच सोशल मीडियावर एक पाणीपुरीच्या बद्दलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये चालत्या ट्रेनमध्ये एक माणूस पाणीपुरी विकताना दिसत आहे. रेल्वेतले लोक त्याच्याकडून पाणीपुरी घेऊन चवीने ती खात आहेत. (Viral Video)

या पाणीपुरी विकणाऱ्या माणसाच्या आजूबाजूला पाणीपुरी खाण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली दिसत आहे. इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ सध्या शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ मोठ्य प्रमाणावर व्हायरल होत आहे. सात दिवसांतच या व्हिडीओला ६० हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केलं आहे.

वेगात धावणाऱ्या या ट्रेनमध्ये हा पाणीपुरीवाला मात्र अगदी बिनधास्तपणे लोकांना हवी तशी पाणीपुरी खायला घालत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचं चांगलंच कौतुक होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

एक युजर म्हणतो, “नीट पाहिलं तर असं वाटत नाहीये की ही रेल्वे खूप जुनी आहे. आणि हे मुंबईमधलं नाही तर कोलकत्त्यामधलं आहे.” तर दुसरा युजर म्हणतो की ‘कोलकत्त्याच्या रेल्वेमध्ये आजकाल काहीही होत आहे.’ तर तिसऱ्या युजरने ‘हा विकसनशील भारत आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी ‘नशीब ही दिल्ली मेट्रो नाही’,अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT